शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

घरकूल लाभार्थी अडचणीत

By admin | Updated: August 17, 2014 22:58 IST

म्हाडा योजनेंतर्गत राजीव गांधी टप्पा २ चे घरकूल भंडारा जिल्ह्यात वाटप करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांना बिनाव्याज गृहकर्ज उपलब्ध करण्यात आले असले तरी बँकांची वसुली सुरु झाली

चुल्हाड (सिहोरा) : म्हाडा योजनेंतर्गत राजीव गांधी टप्पा २ चे घरकूल भंडारा जिल्ह्यात वाटप करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांना बिनाव्याज गृहकर्ज उपलब्ध करण्यात आले असले तरी बँकांची वसुली सुरु झाली असल्याने १४ हजाराहून अधिक लाभार्थ्यांवर व्याजाचा भुर्दंड बसत आहे.ग्रामीण भागात गरीब सामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहेत. हक्कांचा निवारा देणारी घरकूल योजना आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी करताना संबंधित विभागाने शब्द फिरविल्याने लाभार्थ्यांचे व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न चर्चेला आलेला आहे. परंतु तोडगा काढण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय यंत्रणेने घेतला नाही. यामुळे लाभार्थी अडचणीत आलेले आहेत. भंडारा जिल्ह्यात म्हाडा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राजीव गांधी टप्पा २ ही घरकूल योजना सन २०१० वर्षात राबविण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांचे ३५ ते ९० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास अशा लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली आहे. ही यादी अंतिम मंजुरीकरिता पंचायतसमिती स्तरावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सादर करण्यात आली. या योजनेत बँक ९० हजार आणि लाभार्थी १० हजार रुपये असे योजनेचे स्वरुप होते. गृहकर्ज म्हणून दिली जाणारी ही आर्थिक मदत बिनाव्याज बँकांना १ लक्ष रुपये १० वर्षात लाभार्थ्यांनी परत करण्याची अट असल्याची माहिती आहे. प्रस्तावित मंजूर यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नजीकच्या बँकांना दिली. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी गावात संबंधित लाभार्थ्यांची चौकशी करीत १ लक्ष रुपयाचे गृहकर्ज मंजूर केले. या निधीची परतफेड करताना १० वर्षाचे हिस्से आकारणी करण्यात आली. यात व्याज आकारणीची अट नव्हती. बँकांना व्याजाची राशी म्हाडा देणार असल्याने घरकुलांचे बांधकाम केले. अल्पनिधीत घरकुलांचे बांधकाम होत नसल्याने लाभार्थ्यांनी उसनवारीवर पैशाची जुळवाजुळव केली. आर्थिक टंचाई असताना हक्काचा निवारा तयार केला. खापा गावातील महादेव उके, खंताडू तितीरमारे, सुखदेव उके, डिलीराम बावनथडे, ललीता शरणागत, सुखदास पटले, संजयि शरणागत, इंद्रकुमार शरणागत अशी लाभार्थ्यांची नावे आहेत. (वार्ताहर)