शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस त्रास देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:35 IST

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जखमींना मदत करण्याचे अनेक जण टाळतात. महत्त्वाच्या वेळीच मदत न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. मात्र आता रस्ते अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस कुठलाही त्रास देणार नाही, अशी ग्वाही खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : अंमलबजावणीचे ठाणेदारांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जखमींना मदत करण्याचे अनेक जण टाळतात. महत्त्वाच्या वेळीच मदत न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. मात्र आता रस्ते अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस कुठलाही त्रास देणार नाही, अशी ग्वाही खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली आहे.अनेकदा रस्त्यावर अपघात होतो. जखमी त्या ठिकाणी मदतीच्या प्रतीक्षेत असतात. परंतु कुणीही त्यांच्या मदतीला धावून जात नाही. या मागचे मुख्य कारण म्हणजे पोलीस चौकशीचा ससेमिरा होय. अशा प्रकरणात अनेक जखमींना अपघातस्थळीच प्राण सोडवा लागला. अपघातातील जखमींना पहिल्या एक तासात मदत झाली तर प्राण वाचू शकतो. त्यासाठी आता पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना दिली होती. या सूचनांची अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात काटेकोरपणे केली जात आहे. पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनांची काटेकोरणपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याबाबत आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता या आदेशामुळे अपघातातील जखमींना मदत करण्यास सर्वसामान्या पुढे येतील.माहिती देणाऱ्यांची ओळख ठेवणार गुप्तमोटारवाहन अपघातातील जखमीस रुग्णालयात उपचारासाठी नेणाºया अथवा अपघाताची माहिती देणाºयाची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. त्याला कोणताही उलट प्रश्न केला जाणार नाही. अपघाताची माहिती त्रयस्थ व्यक्तीने, नागरिकांनी फोनवरून अथवा प्रत्यक्ष दिल्यास ओळख गुप्त ठेवली जाईल. याबाबत पोलिसांकडून दबाव आणला जाणार नाही, असेही निर्देश देण्यात आले.त्रास दिल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईअपघाताची माहिती देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस किंवा साक्षीदारास शासकीय कर्मचाऱ्याने त्रास दिल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, तसेच विभागीय चौकशी करण्यात येईल. उलट जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांचा जिल्हा प्रशासनाकडून यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.मोटार अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदाराने मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता जखमींना योग्य ती मदत करावी. पोलिसांना दूरध्वनी क्रमांक १०० वर तात्काळ माहिती देऊन तात्काळ सहकार्य करावे.-विनिता साहू, पोलीस अधीक्षक, भंडारा.