शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका

By admin | Updated: March 24, 2015 00:21 IST

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात.

पालांदूर : कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात. पिके लवकर वाढावीत, लवकर उत्पन्न मिळावेत त्याचप्रमाणे रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशांतील अनेक कंपन्यात चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले. त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहेत. यासाठी कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे कारले, भेंडी, वांगी, पालेभाजी, टमाटर आदी पिके विषयुक्त होत आहेत. सर्व पिकांवर उत्पादनांच्या दृष्टीने फवारणी करा असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशके मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत. देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणालाच गरज वाटत नाही. काही कालावधीत आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळाले. आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या जाहिराती वाढल्या आहेत. यात व्यापारी वर्गाचा मोठा फायदा आहे. त्यांना कीटकनाशकांचे फायदे तोटे चांगले माहित आहे. तरी देखील जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळविण्यासाठी लोकांच्या जीवनाशी खेळले जात आहे. ज्यांना याविषयी माहिती आहे अशांनी आपल्या परसबागेत खाण्यापुरते पालेभाज्यांची झाडे लावून बिगर कीटकनाशकांच्या वापराची पिके घेत आहेत. घरीच सेंद्रीय खत तयार करून झाडांना देत आहे. रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. पूर्वी घरोघरी जनावरांचे कळप असायचे. त्यांच्या मलमुत्रामुळे होणारे सेंद्रीय खत मोठ्या प्रमाणात तयार होत होते. सेंद्रीय खतामुळे पिकांची पौष्टीकता वाढत होती. गोहत्येमुळे सेंद्रीय खत मिळणे कमी झाले आहे. (वार्ताहर)