शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ कणांमुळे आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:12 IST

देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.देव्हाडी येथे मुंबई- हावडा रेल्वे फाटकावर उडाणपूलाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. फाटकाच्या दोन्ही बाजूला ‘अप्रोच’ उडाणपूलाचे कामात अदानी वीज कारखान्यातील राखेचा भराव करण्यात आला. पावसाळ्यात उडाणपूलातून पाण्यासह राख पर्यायी रस्त्यावर जमा होत आहे. पाऊस थांबल्यानंतर ही राख रस्त्यावर पडून ती वाळते. त्यानंतर वाहनाच्या रहादारीमुळे ती उडते. वाहने गेल्यावर वातावरणात राखेचा पांढरा थर सर्वत्र दिसतो. समोरची वाहने दिसत नाही.राख श्वास घेतानी नाकात गेल्यावर खोकला येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. डोळ्यात गेल्यावर मोठी जळजळ होते. लहान मुले, वृध्दांना मोठा त्रास होतो. पर्यायी रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. या मार्गाने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची वर्दळ आहे, परंतु सर्वच निमूटपणे येथून जात आहेत. वीज कारखान्यातील राख मानवी शरीरास घातक असल्याचे समजते. उडाणपूलाच्या बांधकामाकडे जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.उडाणपूलाच्या भरावात मुरुमाचा वापर करण्यात आलानाही येथे रासायनिक राखेचा वापर करण्यात आला. उडाणपूलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगडातून लिकेजमुळे पाणी बाहेर निघत आहे. बांधकामात सदोष स्थिती आहे काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. किमान दगडाजवळ मुरुमाचा थर देण्याची येथे गरज होती. १७ ते २० कोटींचे हे बांधकाम आहे. मुरुम उपलब्ध हो तनाही, म्हणून अदानी वीज कारखान्यातील राखेचा उपयोग भरावात करण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हा उडाणपूल तयार होत आहे. उडाणपूलावर नागपूर येथील बांधकाम खात्याचे नियंत्रणात कामे सुरु आहेत.परिसरातील नागरिकांना त्रास, डोळ्याचे आजार बळावले आहे. प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. अनेक तक्रारी केली, पंरतु कारवाई मात्र शुन्य आहे.अदानीची राख रासायनिक आहे. या राखेमुळे मानवी जिवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पूलात राखेचा भराव करण्याची मंजूरी होती काय? याची चौकशी करण्याची गरज आहे. सतत राखेचा तवंग परिसरात राहणे धोकादायक आहे.- डॉ. पंकज कारेमोरेयुवा काँग्रेस नेते तुमसर