शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

हरदोली ७८ क्विंटल धानाचा अवैध साठा

By admin | Updated: December 2, 2015 00:32 IST

हरदोली (सिहोरा) येथील एका शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ७८ क्विंटल ६० किलोग्रॅम धानाचा अवैध साठा आढळल्याने ...

तहसीलदार पथकाची कारवाई : धान केंद्राचे गोदामाला सीलतुमसर : हरदोली (सिहोरा) येथील एका शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ७८ क्विंटल ६० किलोग्रॅम धानाचा अवैध साठा आढळल्याने तुमसर येथील तहसीलदार व पथकाने धान गोदाम सील केले. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी केंद्राला भेट देऊन चौकशी केली.हरदोली (सिहोरा) येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आले. या धान खरेदी केंद्रावर धानाचा अवैध साठा उपलब्ध असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून तुमसर तहसीलदारांना चौकशी करण्याचे निर्देश मिळाले. शनिवारी रात्री ८ वाजता नायब तहसीलदार एन.पी. गौंड, मंडळ अधिकारी एन.पी. तुरकर व दोन पोलीस शिपाई हरदोलीत पोहोचले. धान खरेदी केंद्रातील गोदामाची तपासणी केली त्यात सन २०१४ मधील १८९ धानाचे कट्टे ७८ क्विंटल ६० किलोग्रॅम धानाच्या साठा आढळला. जुने धान व जुना बारदाना असल्याने हा साठा सील करण्यात आला. तहसीलदार सोनवाने, नायब तहसीलदार एच.एस. मडावी, एन.पी. गौंड यांनी भेट देऊन तपासणी केली. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. चौकशीत मील मालकाने आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल केली नाही, अशी माहिती ग्रेडरने दिली. नायब तहसीलदारांनी धान गोडावून सील केले तेव्हा येथील ग्रेडर व व्यवस्थापक उपस्थित नव्हते. मागीलवर्षी भंडारा जिल्ह्यात धान घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात २९ आरधभूत खरेदी केंद्र सुरू असून तुमसर व मोहाडी तालुक्यात २५ धान खरेदी केंद्र सुरू आहे. शासकीय यंत्रणा असताना धानाची साठेबाजी कशी केली जाते हे अनुत्तरीत आहे. मागीलवर्षीच्या प्रकरणाशी संबंध आहे का? त्याचा तपास येथे केला जाणार आहे. एक वर्षापर्यंत धानाचा साठा कसा राहिला यावर तपास यंत्रणेचे लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)