शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिथीनमुक्त शहरासाठी सरसावणार ‘हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:31 IST

शहरातील प्रत्येक दुकानात खरेदीदाराला विक्रेत्यांकडून साहित्यासाठी पॉलिथीन दिली जाते. त्याचा वापर झाल्यानंतर त्या इतरत्र फेकण्यात येतात.

ग्रीन हेरिटेज संस्थेचा पुढाकार : जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाला दिले निवेदनभंडारा : शहरातील प्रत्येक दुकानात खरेदीदाराला विक्रेत्यांकडून साहित्यासाठी पॉलिथीन दिली जाते. त्याचा वापर झाल्यानंतर त्या इतरत्र फेकण्यात येतात. त्यामुळे प्रदूषण तथा पर्यावरणाला धोका पोहचत आहे. यासाठी शहर पॉलिथीनमुक्त करण्यासाठी ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेतला असून जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. पॉलिथीन वापराच्या अतिरेकामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. टूथपेस्ट, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, शॉम्पू, गुटखा, तंबाखू व अन्य पदार्थांसाठी पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. वापरानंतर त्या शहरात इतरत्र बेवारस फेकण्यात येतात. त्यामुळे अनेकदा नाल्यांमध्ये त्या तुंबलेल्या असतात. त्यामुळे नाल्यांमधील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होत असल्याने पर्यायाने तिथे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य तथा पर्यावरणाला धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रीन हेरिटेज संस्थेने शहराला पॉलीथीनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.याबाबत संस्थेचे अध्यक्ष सईद शेख, चंदा मुरकुटे, डॉ.यशवंती गायधने, विलास केजरकर, संध्या किरोलीकर, इंद्रायणी वासनिक, शैलेंद्र श्रीवास्तव, नितीन कुथे, नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, भाजीपाला फेडरेशनचे सुधीर धकाते आदींनी नगराध्यक्ष बाबू बागडे व मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व शहराला पॉलिथीनमुक्त करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. शहर पॉलिथीनमुक्त होण्यासाठी नागरिकांच्याही सहकार्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)१ एप्रिलपासून शहरात पॉलिथीन बंदीपर्यावरण व मनुष्याच्या आरोग्याला पोहचत असलेल्या प्लास्टिक वापराच्या धोक्यातून शहराला मुक्त करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट व शहर स्वच्छतेकरिता व्यापारी, दुकानदार व भाजीपाला विक्रेता यांची सभा घेण्यात आली. यावेळी १ एप्रिलपासून भंडारा शहरात पॉलिथीन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.