शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

अर्धेअधिक कामगार नोंदणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:17 IST

असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान सुरु असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कामगार या नोंदणीपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. सुमारे १३ हजार कामगारांपैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देअर्ज प्रलंबित : १३ हजारांपैकी साडेपाच हजार कामगारांचीच नोंदणी

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान सुरु असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कामगार या नोंदणीपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. सुमारे १३ हजार कामगारांपैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंद करण्यात आली. आणखी १० ते १२ हजार अर्ज प्रलंबित असून विविध लाभापासून कामगार वंचित आहेत.भंडारा-गोंदिया जिल्हा असंघटित बांधकाम कामगारांचे २०१२ ते २०१८ या कालावधीत सुमारे १३ हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी करण्यात आली आहे. शेकडो अर्ज आजही प्रलंबित आहे. केवळ रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करणाऱ्यांची नोंदणी मार्गी लावली जात आहे. दरवर्षी ही संख्या वाढत असून सध्या दहा ते बारा हजार असंघटित बांधकाम कामगारांचे अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य शासनाने कामगारांच्या हितासाठी अनेक योजना आणल्या आहेत. नोंदणीकृत असंघटित बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आदी १९ प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा त्यात समावेश आहे. परंतु संबंधीत विभागाच्या कासवगतीने शेकडो कामगार या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत कोणीही दखल घेतली नाही.सदर योजनेसाठी राज्यशासन नियमित मोठा निधी देते. परंतु संघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी रखडल्याने निधी तसाच पडून असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे तथा घरेलु कामगार असंघटित संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुंभारे यांनी केला आहे. तुमसर येथे शुक्रवारी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात विविध प्रकारच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत कामगारांची नोंदणी होणार आहे. त्यात असंघटीत क्षेत्रात काम करणाºया कामगारांनी आपली नावे नोंदवावे असे आवाहन कांबळे व कुंभारे यांनी केले आहे. यासंदर्भात सहायक कामगार आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.