शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात गारपीट

By admin | Updated: March 17, 2016 00:39 IST

मंगळवारला सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वादळ, पाऊस व गारपिटीने चप्राड, मेंढा, सोनी, चिचगाव, इंदोरा या गावांना चांगलेच झोडपले.

नुकसानभरपाईची मागणी : शेतपिकासह जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान लाखांदूर : मंगळवारला सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वादळ, पाऊस व गारपिटीने चप्राड, मेंढा, सोनी, चिचगाव, इंदोरा या गावांना चांगलेच झोडपले. शेतपिकासह जनावरे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा थर रस्ते व घरासमोर साचल्याने काहींनी आनंद लुटला तर नुकसानग्रस्त मात्र चिंताग्रस्त दिसले.उन्हाळ्याच्या दिवसात अचानक पावसाला सुरुवात झाली की अनेकांच्या मनात धडकी भरते आणि काल सायंकाळी नेमके तेच झाले. मागील दोन वर्षापूर्वी तालुक्यातील दिघोरी येथील गारपिटीने भयावह दृष्य आठवू लागले. अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. बघता बघता गारपीटीला सुरुवात झाली. गारपीट मोठ्या प्रमाणावर होणार नाही हा नागरिकांचा अंदाज काही मिनिटात खोटा ठरला. संपूर्ण रस्ते, घरासमोरील खुली जागा, नाल्या बर्फाने झाकल्या गेल्या. गारीचा आकार मोठा असल्याने अनेकजण घरातच दडी मारून होते तर काहींनी पानटपऱ्यांचा आसरा घेतला. घरावरचे कवेलू, टीन उडाले, पानटपऱ्या, झोपड्या हवेत उडाल्या. जनावरांच्या अंगावर गारपिटीचा तडाखा बसत असतानासुद्धा पर्याय नसल्याने जखमी झाल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. संपूर्ण गाव बर्फमय झाले होते. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या शेतात असलेले गहू, मका, चना, पपई , वळांचे मोठ्या प्रमाणावर यावेळी नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नाल्यामध्ये, रस्त्यांवर गारांचा खच जमा होता. काहींनी गारांचा मनमुराद आनंद लुटला तर नुकसानग्रस्त डोक्यावर हात ठेवून चिंतेत बसले दिसले. चप्राड, मेंढा, सोनी, चिचगाव, इंदोरा या गावांना भेट देऊन जि.प. सदस्य रमेश डोंगरे यांनी नुकसानीची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)