शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जिप्सी जाग्यावरच, पिटेझरी अभयारण्य गेटही सुनसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या भंडारा जिल्ह्यातील तीन गेटवर ५० जिप्सी आणि १०७ गाईड आहेत. तसेच कोका आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथेही गाईड आणि जिप्सी आहेत. मात्र दोन वर्षांपासून पर्यटन ठप्प झाले आहे. पर्यटनाला बंदी असल्याने जिप्सी जाग्यावरच उभ्या आहेत. गाईडलाही कोणतेच काम मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येत आहे.

ठळक मुद्देकोरोना संकट : गाईड व वाहन चालक बेरोजगार, अभयारण्य पर्यटन ठप्प

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अभयारण्य पर्यटनावर अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो. कोरोना संकटाने गत दोन वर्षांपासून अभयारण्य पर्यटन ठप्प पडले आहेत. परिणामी गाईड्स, जिप्सी चालक आणि मालक बेरोजगार झाले आहेत. जंगल परिसरात पर्यायी व्यवसाय नसल्याने अनेकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आहेत. दरवर्षी शेकडो पर्यटक एप्रिल ते जून या कालावधीसाठी पर्यटनासाठी येतात. त्यामुळे येथे असलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालक, मालकांना रोजगार उपलब्ध होतो. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या भंडारा जिल्ह्यातील तीन गेटवर ५० जिप्सी आणि १०७ गाईड आहेत. तसेच कोका आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथेही गाईड आणि जिप्सी आहेत. मात्र दोन वर्षांपासून पर्यटन ठप्प झाले आहे. पर्यटनाला बंदी असल्याने जिप्सी जाग्यावरच उभ्या आहेत. गाईडलाही कोणतेच काम मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येत आहे. पर्यायी रोजगाराची व्यवस्था आणि शासकीय मदत मिळावी यासाठी जिप्सी चालक, मालक संघटना आणि गाईड्स संघटनेने लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे साधारणत: २०० कुटुंब अडचणीत आले आहेत.महाराष्ट्र राज्य गाईड युनियनचे सचिव भारत उईके म्हणाले, आता आम्हाला कोणतेच काम नाही. घरात जे असेल ते खायचे आणि दिवस काढायचा, अशी आमची अवस्था आहे. दिवसाला साधारणत: ६०० ते ७०० रुपये हंगामात मिळायचे परंतु आता तेही मिळत नाही. वन्यजीवांच्या संरक्षणासोबत माणसांच्याही समस्या सरकारने सोडवाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाच दिवसाच्या जंगल सफारीनंतर आता पुन्हा केव्हा सफारीला प्रारंभ होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाच दिवसाच्या पर्यटनाकडे पाठ - कोरोना संसर्गामुळे ऐन हंगामात बंद पडलेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २६ ते ३० जून या कालावधीत पर्यटनाला परवानगी देण्यात आली होती. पर्यटक मोठ्या संख्येने येतील, अशी अपेक्षा होती. परंतु काही मोजके पर्यटक सोडले तर या पाचही दिवसात पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे असल्याने आणि कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाची भीती असल्याने अनेकांनी या जंगल सफारीकडे पाठ फिरविली आहे. या पाच दिवसात तरी रोजगार मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या गाईडस व जिप्सी चालकांची निराशा झाली.  पर्यटनात मास्टर डिग्री पण बेरोजगारीचे संकट - नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी गेटवर गत १४ वर्षांपासून लेहेंद्र गेडाम हे गाईडचे काम करतात. त्यांच्या मालकीच्या दोन जिप्सी आहे. साकोली तालुक्यातील जांभळी सडक हे त्यांचे गाव. बालपणापासून जंगलाशी नातं असल्याने त्यांनी प्रवास व पर्यटन या विषयात नागपूर विद्यापीठातून मास्टर डिग्री मिळविली. एवढेच नाही तर वन्यजीव पर्यटनात पदव्युत्तर डिप्लोमाही घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ते एकमेव गाईड आहे. तेव्हापासून  पिटेझरी गेटवर ते गाईडचे काम करीत आहेत. परंतु उच्च शिक्षण घेऊनही कोरोनामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे.

सुरक्षा ठेव परत करा - अभयारण्यात पर्यटनासाठी जिप्सी मालकांना एक हजार रुपये वार्षिक शुल्क आणि पाच हजार रुपये सुरक्षा ठेव ठेवावी लागते. परंतु दोन वर्षांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. सुरक्षा ठेव परत करून मदत म्हणून पाच हजार असे दहा हजार रुपये देण्याची मागणी वन्यजीव विभागाकडे संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु त्यालाही अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. ही मदत मिळाली तर बंद असलेल्या जिप्सीची दुरुस्ती करणे सोईचे होईल, असे जिप्सी मालक सांगतात. कोरोना संकटाने आम्हाला रस्त्यावर आणले आहे. मदतीची आस लावून बसलो असल्याचे सांगतात.

 

टॅग्स :forest departmentवनविभागtourismपर्यटन