शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिले पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:26 IST

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलवादी भागातील केसलवाडा पवार या गावात पोलिस चौकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देकेसलवाडा पोलीस चौकीचे उद्घाटन : ग्रामस्थांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलवादी भागातील केसलवाडा पवार या गावात पोलिस चौकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, तहसीलदार मलिक विराणी, सरपंच अनील नंदेश्वर, मोरेश्वर पटले, कांबळे, नूतन पवार आदी उपस्थित होते.कोका जंगलाचा हा भाग असून काही प्रमाणात नक्षल भाग आहे. आजपर्यंत एकही पालकमंत्री या गावाने पहिला नाही. या गावात येणारे ना. बावनकुळे हे पहिलेच पालकमंत्री आहेत. भारतमाता व महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन ना. बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.आ. बाळा काशिवार यांनी या चौकीसाठी चार वर्षे पाठपुरावा केला. वर्ग दोनचे जमिनीचे प्रकरण वर्ग १ मध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ५०० फुटापर्यंत सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. पंतप्रधान आवास योजनेत सर्वांसाठी घरे योजना आली आहे. आपल्या सरकारला 4 वषार्चे झाले आहेत. या काळात शासनाने जास्तीत जास्त लोकोपयोगी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने ६५ योजनांसाठी भंडारा जिल्ह्याला निधी दिला आहे. यंदा जिल्हा नियोजन समिती १४० कोटीवरून २०० कोटींवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणणार आहे. तसेच सर्व शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे, मालमत्तेचे रक्षण करणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. पोलिस मित्र बना. एका गावातून ५ तरुण पोलिस मित्र बना. पोलिसांना मदत करा. जुन्या काळात पोलीस लागतच नव्हते. समाजमन चांगले असले की पोलिसांची गरज पडत नाही. पोलीसही शेवटी माणूस आहे, याचा विचार केला पाहिजे. या चौकीच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा ना. बावनकुळे यांनी केली. पोलीस चौकीशिवाय हा भाग सुटला होता. पण मुखमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ही मागणी मान्य केली आणि आज उदघाटन होत आहे, असे आ. काशिवार म्हणाले. ठाणेदार मंडलवार यांनी प्रास्ताविक केले.