शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाचे चुकारे अडले

By admin | Updated: August 7, 2015 00:45 IST

तालुक्यातील कोष्टी, बाम्हणी, उमरवाडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस दि वैनगंगा साखर कारखाना यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच खरेदी केला.

सात महिन्यांपासूनची ओरड : शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगरतुमसर : तालुक्यातील कोष्टी, बाम्हणी, उमरवाडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस दि वैनगंगा साखर कारखाना यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच खरेदी केला. मात्र सात महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही उसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.तालुक्यात शेतकऱ्यांना वरदान ठरणारा वैनगंगा साखर कारखान्याची खरेदी करून साखर कारखान्याला नवसंजीवनी दिली. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे सतत अडतच असल्याने कारखाना शाप की वरदान असेच म्हणण्याची वेळ आता तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे. जानेवारी २०१५ पासून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वैनगंगा साखर कारखान्यामार्फत तोडल्या जावून तो कारखान्यात पोहचता करण्यात आला. परंतु त्याचे चुकारे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. आधीच दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले आहे. त्यामुळे पैशाची उभारणी करणार कुठून या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. आधीच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोसायटी तसेच सावकारांकडून पैशाची उचल केली असून व्याजरुपी कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस वाढतच असताना शेतात रोवणी कशी करायची? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष दादा टिचकुले यांच्याशी काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता आठ दिवसात चुकारे मिळतील, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटून गेला तरी अद्यापही चुकारे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.उमरवाडा येथील ऊस उत्पादक शेतकरी गणेश बनकर यांनी शेतात ऊसाची लागवड केली असता रानडुकरांच्या हैदोसामुळे संपूर्ण ऊसाच्या शेतीचे नुकसान झाले असताना त्या शेतकऱ्याने शेतीत उरलेला ऊस वैनगंगा साखर कारखान्याला १ लक्ष ३५ हजार रुपयांमध्ये विकला. मात्र आजपावेतो चुकारा न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अडलेल्या शेतकऱ्यांवर ओढविल्याने ऊस उत्पादक शेतकरी, गणेश बनकर, कारू किरणापुरे, अंबादास कावळे, नारायण गिरडकर, अनमोल गिरडकर, गोविंद हजारे, बाळकृष्ण किरणापुरे, प्रकाश हजारे, लक्ष्मण बनकर, भाऊराव खरवडे, ईश्वर सोनवानेसह आदी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक व अध्यक्षांना निवेदन देवून चुकारे मिळण्याची मागणी केली. (शहर प्रतिनिधी)