विविध कार्यक्रमांचे आयोजन : दुचाकी रॅली, पुस्तकांचे वाटप, ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरणभंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त रॅली, धम्मवंदना, ध्वजारोहण, बाईक रॅली, भव्य मिरवणुक, महाप्रसादाचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. समता सप्ताहानिमित्त कार्यक्रम सादर करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयभंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनििमत्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शासकीय वस्तीगृह, भंडाराभंडारा : येथील आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह भंडारा क्र. २ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहपाल माळी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वासनिक होते. कार्यक्रमाप्रसंगी माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थी, आनंद वाडीवे, अमित कुंजाम, प्रदीप मडावी, धनंजय मडावी, सेवन मुलेटी, गणपत राऊत, मनोज पेंदाम, रूपेश धीवकुवर आदी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन सेवन मुलेटी यांनी तर आभार प्रदर्शन आनंद वाडीवे यांनी केले. राष्ट्रीय विद्यालय, भंडाराभंडारा : राष्ट्रीय विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रत्नदीप मेश्राम होते. अतिथी म्हणून पर्यवेक्षक अनिल कापट, शिक्षिका ज्योती घोडमारे यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी जुबेर कुरैशी, सेवनलाल नंदेश्वर, भूषण फसाटे, अल्का हटवार, वर्षा ठवकर, कविता भिवगडे, रेखा घावडे, श्रीराम शहारे, पराग शेंडे, हरिचंद्र चव्हाण, राहुल बावनकुळे, गंगाधर मुळे, शेखर थोटे, राजेश रघुते, सरोज भांडारकर आदींनी सहभाग नोंदविला.मॉडर्न हॉयस्कूल, सातोनाभंडारा : मॉडर्न हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज सातोना येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पडोळे होते. यावेळी शाळेचे पर्यवेक्षेक पी.टी. कारेमोरे, परीक्षा प्रमुख आर.एम. बुरबादे, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्राची यथार्थता बुरबादे यांनी याप्रसंगी मनोगतातून अभिव्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनाच्या पैलूंचा मनोगतातून वेध घेतला. पर्यवेक्षक कारेमोरे, प्राध्यापक भिमटे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन स्वाती खेडकर या विद्यार्थीनीने तर आभारप्रदर्शन पल्लवी पडोळे हिने केले. कार्यक्रमासाठी प्रा. ढोमणे, वऱ्हाडे, प्रा. भिमटे, प्रा. कुंभारे यांनी सहकार्य केले.ग्रामपंचायत सालेबर्डीजवाहरनगर : सालेबर्डी पांधी येथे गट ग्रामपंचायत कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण अर्पित करून समरसता व सद्भावनेची सामूहिक शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित सालेबर्डी सरपंचा जिजा मेश्राम, उपसरपंच मनोहर मेश्राम, तंमुस होमदेव तितीरमो, खैरीचे तंमुस अर्जुन शहारे, माजी सरपंच कुसन टिचकुले, ग्रामसेवक यु.जी. भुरे, सोमा कांबळे, दयाराम राखडे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रा.पं. परिचर नाना सरादे, भिमराव घरडे यांनी सहकार्य केले.सालेबर्डी वाचनालयजवाहरनगर : जवळील सालेबर्डी खैरी येथील स्व. कबल स्मृती सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला सालेबर्डीच्या सरपंचा जिजा मेश्राम, खैरीचे तंमुस अर्जून शहारे, माजी सरपंच कुसन टिचकुले, सालेबर्डीचे तंमुस होमदेव तितीरमारे, ग्रा.पं. सदस्य रणभीर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश् शेंडे, दयाराम राखडे, सोमा कांबळे व नियमित वाचक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार वाचनालयाचे सचिव मनोहर मेश्राम यांनी मानले.नवजीवन विद्यालय, जमनापुरसाकोली : नवजीवन विद्यालय अॅन्ड ज्यु. सायंस कॉलेज जमनापूर साकोली येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सुपारे होते. पाहुणे म्हणून शाळेचे सहा. शिक्षक नरेंद्र कापगते व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. सुपारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण आणि सामाजिक कार्य याबद्दल माहिती दिली. संचालन अमोल वाकडे यांनी केले तर आभार अर्चना नवखरे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक प्रमोद ठाकरे, शिवाजी सुरकार, विनोद किरपाण, मुकेश येसनसुरे, अल्का गोंधळे व कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.सुबोध विद्यालय, मासळमासळ : सुबोध विद्यालयात प्राचार्य जी.एन. टिचकुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राचार्य टिचकुले यांनी भूतकाळचा विचार न करता भविष्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करून, जीवन सफल बनवावे. विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ न गमावता वाचनात वेळ घालवावा. वेळेचा उपयोग वाचनासाठी करावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजसेवक हरिश्चंद्र लाडे, पुरूषोत्तम भलावी, एच.के. वैद्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी अतिथींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. संचालन व्ही.टी. सार्वे यांनी तर आभारप्रदर्शन आर.के. घोनमोडे यांनी केले.शास्त्री विद्यालय, गोंडउमरीगोंडउमरी : लाल बहादूर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गोंडउमरी येथे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.आर. गोमासे होते. प्रमुख पाहुणे एम.टी. मेश्राम उपमुख्याध्यापक आर.के. मुंगुलमारे पर्यवेक्षक, एस.एन. शहारे व्याख्याता उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली वाहण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थी ग्रीष्मा राऊत, रितीक उके, प्राची मेश्राम व समिक्षा रामटेके यांनी गीत व भाषणे सादर करून् बाबासाहेबांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संचालन जी.आर. कोरे तर आभार प्रदर्शन के.डी. गहाणे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर व विद्यार्थी उपस्थित होते.मोहरकर विद्यालय, अड्याळअड्याळ : येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण अर्पित करून समरसता व सद्भावनेची शपथ घेण्यात आली. डोमळे विद्यालय, कुंभलीकुंभली : स्थानिक नारायणराव डोमळे विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.टी. लांडगे होते. अतिथी म्हणून एच.आर. कळसकर, पी.पी. बावणे, डी.आर. बडवाईक होते. यावेळी प्रमुख अतिथी व अध्यक्षांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी जे.आर. येरपुडे, सी.जी. ठाकरे, एस.डी. पराते व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन टी.एम. जवंजार यांनी केले.फ्रेन्डस ग्रृप, भंडाराभंडारा : फ्रेन्डस ग्रृपच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या १२५ व्या जयंती निमित्त बापु बालक आश्रम भंडारा येथे लहान मुलांना साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आकाश सुर्यवंशी, उमेश मोटघरे, प्रकाश जांभुळकर, प्राणहंस हटवार, संदीप सुर्यवंशी, मयुर मासुरकर, विकास उके, पवन रजक, रवि साठवणे, हर्षदिप पडोळे, रिशिन रामटेके उपस्थित होते.संत शिवराम शाळा भंडाराभंडारा : संत शिवराम महाविद्यालय उच्च प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी होते. अतिथी म्हणून रजनी सेलोकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबाच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण दिले व गीत सादर केले. अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. संचालन भिवगडे यांनी तर आभार प्रदर्शन उके यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.केंद्रीय प्राथ.शाळा, कुंभलीकुंभली : स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कुंभली येथे आयोजित कार्यक्रमाला सरपंच विमल हुकरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगेंद्र रामटेके, सेवा सह. संस्था कुंभलीचे अध्यक्ष राजाराम भेंडारकर, शाळा न.स. माजी अध्यक्ष प्रमोद शेंडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या वनिता ठलाल, तंमुस अध्यक्ष रविंद्र सोनपिपरे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक पी.बी. बोकडे शिक्षकवृंद, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. कवलेवाडा ग्रामपंचायतपालांदूर : कवलेवाडा गट ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच वैशाली खंडाईत, जि.प. सदस्य वर्षा रामटेके, उपसभापती विजय कापसे, उपसरपंच पांडूरंग खंडाईत, ग्रामसेवक जे.डी. वेदी, सीताराम खंडाईत, हरीदास बडोले, पोलीस पाटील गुणीराम बोरकर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.जि.प. प्राथ.शाळा सावरबंदकुंभली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरबंद येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अविनाश हारे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाल बडवाईक, मुुंगमोडे, उपरीकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थीनी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर.जे. टेंभुर्णे यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडाराभंडारा : येथील नूतन महाराष्ट्र विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पी.पी. लोणारे या होत्या. अतिथी म्हणून शिक्षक बांडेबुचे, उपमुख्याध्यापक टिचकुले, पर्यवेक्षक बारई, राठी उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणे व गीत सादर केले. मुख्याध्यापिका लोणारे यांनी बाबासाहेबांची शिकवण भाषणादरम्यान सांगितली. संचालन वैभव गजापुरे यांनी तर आभार गणू वाघमारे हिने मानले.शिव विद्यालय, मिन्सीपवनी : आदिवासी शिव विद्यालय मिन्सी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक एम.व्ही. फंदे होते. पाहुणे म्हणून आय.एस. भेंडारकर, बी.ए. मेश्राम तर प्रमुख वक्ते म्हणून ए.एन. पुरामकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात शालेय विद्यार्थीनी गीत, भाषणे सादर केले. प्रमुख वक्ते एन. पुरामकर, सहा. शिक्षक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून शिक्षणाचे व वाचनाचे महत्व सांगितले. अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून जयंती साजरी केली. संचालन डी.आर. भोयर व आभार प्रदर्शन एम.सी. चौधरी यांनी केले. परसोडी येथे अभिवादनलवारी : साकोली तालुक्यातील परसोडी सौं. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन पंचायत सतिमी सदस्या जयश्री पर्वते यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाला ग्राम विकास अधिकारी डी.एम. कोचे, उपसरपंच मोतीराम कापगते, पोलीस पाटील शंकर वाघ, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पर्वते, रामकृष्ण मासूरकर, तसेच वसंता उके, पांडूरंग गेले, तिरराज तुरकर, भाष्कर कांबळे, तुलसी बनकर आदीसह समाज बांधव, ग्रामवासी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.महेंद्र विद्यालय, बेलाभंडारा : महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बेला येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अर्जुन गोडबोले होते. यावेळी सुधाकर साठवणे उपस्थित होते. बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन या विषयावर विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भीमबुद्ध गीत गायली व जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रा. मोरेश्वर गेडाम, विनोद मेश्राम व सुधाकर साठवणे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आचरणाची गरज आहे, असे सांगितले. संचालन शुभांगी बन्सोड यांनी केले. आभार सुलोचना कुंभारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी चाचेरे, निर्वाण, जे.वाय. निंबार्ते, आनंद गजभिये, प्रदीप गजभिये, हरिश्चंद्र धांडे, धनराज मते यांचे सहकार्य लाभले.साकोलीत दुचाकी रॅलीसाकोली : तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व विविध कार्यक्रम घेण्यात आले. साकोली येथे सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथून निघून साकोली व सेंदुरवाफा येथे गेली. या रॅलीत माजी सभापती मदन रामटेके, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, यशपाल कराडे, राकेश भास्कर, रवी राऊत, जे.डी. मेश्राम, ओम गायकवाड, किरण मेश्राम, डॉ. अमन भेंडारकर आदी उपस्थित होते. तसेच नागझिरा मार्गावर नागरिकांना शरबतचे वितरण करण्यात आले. यावेळी घनश्याम पटले डॉ. अरविंद कोटांगले, जनार्धन कापगते, भगवान लांजेवार, संजय बडोले, प्रमोद गजभिये, विशाल साखरवाडे, नरेंद्र वाडीभस्मे, सुरेश कापगते, आशिष सिंगनजुडे, यशपाल गजभिये, शैलेश गणवीर उपस्थित होते.भाजप जिल्हा व्यापारी आघाडीभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीचे नितीन दुरगकर व इंजिनिअरींग सेलचे आशिष गोंडाणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मिठाई वाटली. कार्यक्रमाला राष्ट्रीय नेते डॉ. प्रशांत खोब्रागडे, प्रविण उदापुरे, ललीत चव्हाण, राजु देसाई, भुपेरा तलमले, तुषार ईलमकर, अतुल मानकर, सोनम वाघमारे, मुकेश ढगे, अरुण भेदे, रिगण चांदेकर, अमोल शहारे, नितेश नागदेवे आदी उपस्थित होते.पोलीस मुख्यालय, भंडाराभंडारा : पोलीस नियंत्रण कक्ष येथील प्रांगणात जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहु यांच्या अध्यक्षतेखाली जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनीता साहु, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, पोलीस उपअधीक्षक के.एच. धात्रक, राखीव पोलीस निरीक्षक लोळे, पोलीस निरीक्षक कोलवाडकर, इंगोले, महिला सेलच्या ललीता तोडासे तसेच सर्व शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी व आरसीपीचे कर्मचारी उपस्थित होते.बौद्ध विहार समिती, भंडाराभंडारा : रमाबाई आंबेडकर वॉर्ड, भंडारा येथील बौद्ध विहारात अमृत शहारे यांच्या अध्यक्षतेखाली व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भन्तेच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य अर्जून गोडबोले व भूवैज्ञानिक वाल्दे यांचे बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर भाषण झाले. संचालन शैलेंद्र जांभूळकर यांनी केले तर आभार विद्या साखरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी हुसन बडोले, केवल कोचे, रितेश नंदेश्वर, भावना नंदेश्वर, कोटांगले, शशांक बडोले, कुंदा गोडबोले, माधुरी बन्सोड, जगदीश लाडे, दयाराम कोचे, संजय सतदेवे, गीता सतदेवे, रमेश कोचे, सुरेंद्र नंदेश्वर, उपाध्ये, कांबळे, जयराम नंदेश्वर, शशांक बडोले यांनी सहकार्य केले.उसर्रा येथे कार्यक्रमउसर्रा : उसर्रा येथे आयोजित कार्यक्रमात समाज बांधवांच्या वतीने गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.पवनीत काँग्रेसतर्फे ध्वजारोहणपवनी : शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्थानिक गांधी चौकात ध्वजारोहन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यता आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, सभापती निलकंठ टेकाम, नगराध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, विकास राऊत, प्रकाश पचारे, युवराज वासनिक, अश्फाक पटेल, नगरसेवक धमेंद्र नंदरधने, वनीता सयाम, सुरेखा जनबंधू, हिरा मानापुरे, पं.स. सदस्य बंडू ढेंगरे, डॉ. विक्रम राखडे, प्रा. श्रीकृष्ण शिवणकर, हंसराज रामटेके, मनोहर उरकुडकर, तुळशीदास बिलवणे, मीरा उरकुडकर आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)
प्रज्ञासूर्य बाबासाहेबांना अभिवादन
By admin | Updated: April 15, 2016 00:59 IST