शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

सलाम तुमच्या मैत्रीला!

By admin | Updated: January 24, 2016 00:38 IST

राजकारणात माणूस मोठा झाला की गतकाळाचा विसर पडतो. राजवैभव मिळाले तर वेळेचा अभाव जाणवतो, ...

राजकारणात माणूस मोठा झाला की गतकाळाचा विसर पडतो. राजवैभव मिळाले तर वेळेचा अभाव जाणवतो, परंतु केंद्रीय भूतल परिवहन, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे मात्र याला अपवाद ठरले आहे. शनिवारच्या भंडारा जिल्ह्यातील भरगच्च कार्यक्रमाच्या दौऱ्यात कुठलाही उल्लेख नसताना ते हेलिकॉप्टरमधून उतरले आणि कुणालाही कळण्याच्या आत गडकरींच्या वाहनांचा काफिला खांबतलाव चौकाकडे निघाला, तो रामभाऊ आस्वले या मित्राच्या भेटीसाठी.रामभाऊ ‘सेरेब्रल अ‍ॅट्राफी’ या दुर्मिळ आजारामुळे घरीच असतात. अर्धा तासाच्या भेटीत गडकरींनी त्यांच्याशी प्रकृतीविषयी चर्चा केली. ‘रामभाऊ भंडारा जिल्ह्यात तू भाजप रूजविली, तुझ्या कार्याने आज भंडारा भाजपमय झाला’ अशी आठवण करून देत चर्चा सुरू झाल्या. गडकरींचे म्हणणे रामभाऊ ऐकत होते. परंतु आजारामुळे बोल अस्पष्ट निघत होते. रामभाऊंचे बोल वहिणी गडकरींना सांगत होत्या. आता मुंबईला डॉक्टरकडे नेण्याच्या सूचना करून मी डॉक्टरांशी बोलतो, ‘रामभाऊ लवकर बरे व्हा’, असे सांगत त्यांनी मित्राचा निरोप घेतला.रामभाऊ आस्वले यांनी नागपुरातून बीई आर्किटेक्टची पदवी घेतली. त्यानंतर सिव्हील, टाऊन प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी ते पुण्यात गेले. तिथे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर यांच्याशी अभाविपच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भंडाऱ्यात व्यवसायाला प्रारंभ केला. काँग्रेसचा गड असलेल्या भंडाऱ्यातून १९९० मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढले आणि आमदार झाले. त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या. १९९५ मध्ये युतीचे सरकार असताना त्यांना मंत्रिपदाची संधी होती, परंतु मतदार दुरावतील या भीतीमुळे त्यांनी मंत्रिपद स्वीकारले नाही. २०१० मध्ये त्यांना आजार लक्षात आला. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त राहू लागले. आजार वाढू लागल्यानंतर ते घरीच राहतात. बोलताना अडखडत असले तरी वृत्तपत्र, दूरचित्रवाहिणीतून जिल्हा, राज्य, देशातील घडामोडींचा वेध घेत असतात. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर भंडाऱ्यात आले असताना रामभाऊंच्या भेटीसाठी गेले होते. आता केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा भंडाऱ्यात आले असतानाही त्यांच्या भेटीसाठी गेले, गडकरींची ही भेट निखळ मैत्रीचा पुरावाच म्हणावा लागेल. राजकारणात असूनही नितीन गडकरी हे शब्द देत नाही, दिला तर तो पाळतात, त्यामुळे त्यांना शब्दाचे पक्के मानले जाते. बांधकाम मंत्री असताना तामसवाडी पुलाच्या उद्घाटनासाठी ते आले. त्यादिवशी त्यांना ‘ताप’ आलेला होता. परंतु दौरा ठरलेला असल्यामुळे ते उद्घाटनासाठी आले होते. ज्या मार्गाने प्रवास सुरू होता तो मार्ग नादुरूस्त होता, त्यावेळी मुख्य मार्ग केव्हा सुरू होईल, असे सोबत असलेल्या पत्रकाराला विचारले. यावर त्या पत्रकाराने हा मुख्य मार्गच असल्याचे सांगितले. यावर ते काहीच बोलले नाही. त्यानंतर वर्षभरात तो २५ कि.मी. रस्ता पुर्ण झाला. आजही हा रस्ता सुस्थितीत आहे. आजच्या दौऱ्यात त्यांनी जल वाहतुकीबद्दलचे महत्त्व सांगताना जलमार्गाचा पहिला प्रयोग महाराष्ट्रातील वैनगंगा नदीमधून करणार असल्याची घोषणा केली. वैनगंगेतून बसून विशाखापट्टणम पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन, असे अभिवचन दिले, त्यांचे हे अभिवचन पूर्ण होवो, ही सदिच्छा!