शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याला फुटले कोंब गहू होतोय काळसर

By admin | Updated: March 18, 2015 00:48 IST

सलग चार दिवस अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली.

भंडारा : सलग चार दिवस अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली. गहू, हरभरा, तूर यासह भाजी पिकांचीही नासाडी झाली. तालुक्यातील बहुतांश शेतातील हरभऱ्याला कोंब फुटले असून काही शेतातील गहू काळा पडायला सुरूवात झाली.खरीप हंगामात धान व इतर पिकांची झालेली नासाडी अजूनही शेतकरी विसरले नाहीत. शासनाच्या मदतीच्या नावावर मिळणारी तुटपुंजी रक्कम अजूनही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. महिनाभरापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. खरीप हंगाम हातचा गेला रब्बी पिकाकडून आस लावून बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव बदलते हवामान पाहून टांगणीला लागत आहे. तालुका गारपिटीतून बचावला असला तरी ढग मात्र कायम आहेत. रबी पिकाचेही नुकसान करायचे असे जणू निसर्गाने ठरविले असावे. या भितीने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची शेती फुरविली. त्यांचे या तीन चार दिवसांच्या अवकाळी पावसाने कंबरडे मोडले. पाऊस अधूनमधून पडत आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा सोंगून गंज लावले त्यांच्या पदरी आता घुंगऱ्या पडत आहे. गंजी लावलेला हरभरा काळाशार पडत आहे. गेल्या वर्षी झालेल्या नापिकीची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सर्वेक्षण केले जात आहे. त्यातच घोळावर घोळ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने कुणाला लाभ तर कुणाला भोपळा, अशी स्थिती गेल्या दोन वर्षात झाल्याने नुकसान भरपाई मागायची कुणाला, अशा मन:स्थितीत शेतकरी आला आहे. (प्रतिनिधी)