शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या घरांना अनुदान अल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

पालांदूर : शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना निवारासाठी घरकूल मंजूर केले जाते. यासाठी एक लक्ष २० हजार रुपयांचे ...

पालांदूर : शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना निवारासाठी घरकूल मंजूर केले जाते. यासाठी एक लक्ष २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्धारित केले आहे. परंतु इंधन दरवाढीच्या संकटाने बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. वास्तव परिस्थितीचा विचार करून घरकूलच्या निधीत वाढ करण्याची अपेक्षा लाभार्थ्यांनी केली आहे.

लाखनी तालुक्यात सुमारे पंधराशे लाभार्थ्यांना विविध योजने अंतर्गत घरकूल मंजूर झालेले आहे. यातील पहिला टप्पा घरकूल सुरू होण्यापूर्वीच मिळाला. मात्र त्यानंतर काम अपेक्षित स्तरावर जाऊ नये, उर्वरित निधी मिळण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. दोन ब्रास रेती घरकूल लाभार्थ्यांना मंजूर असूनही शासनाकडून अपेक्षित सहकार्य होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे घरं आजही पावसाच्या दिवसात अपुरे पडलेले आहे. आज सगळीकडेच पक्क्या घरांचे बांधकाम केले जाते. सिमेंटचे जंगल सगळीकडेच विस्तारित होत आहे. त्यामुळे सिमेंट, वाळू, विटा, लोखंड व इतर साहित्यासह मजुरीचे दर वाढले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निधीत घरकूल बांधणे निश्चितच अशक्य आहे. पावसाळ्याचे दिवस येऊन गरिबांचे घर अजूनही राहण्यायोग्य झालेले नाही. अभ्यासांती आर्थिक टंचाई हेच एक कारण पुढे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रोशन खंडाईत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्ह्यातील, तालुक्यातील व स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांच्या समस्यांना न्याय देत घरकूल निधीत वाढ करावी.

घरकूल मंजूर होऊन अर्ध्याच्यावर बांधकाम झालेले आहे. मिळालेल्या निधीत घरकूल बांधणे अशक्य आहे.

कोट

वाढती महागाई व शासनाने निर्धारित केलेली घरकुलाची निधी यात मोठी तफावत आहे. महागाईचा विचार करता सुमारे २ लाख ५० हजार रुपयापर्यंतचा खर्च सर्वसामान्य अपेक्षित आहे. मायबाप सरकार निश्चितच सकारात्मक रीतीने घरकूल निधी वाढविण्याकरिताचे प्रयत्न आवश्यक आहेत.

नामदेव राऊत, घरकूल लाभार्थी, पालांदूर