शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

ग्रामसेवकांचा मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 01:18 IST

ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ११ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराभंडारा : ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि.११ जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद चौकातून मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यात शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले होते. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेला संघटनचे राज्य सरचिटणीस अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विलास खोब्रागडे आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवकांनी केली. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाही. सहनशिलतेचा अंत झाला आहे. ग्रामसेवक गावात ग्रामसभा घेतो, वार्षिक सभा घेतो, दुष्काळ पडल्याच्यानंतर अतिशय प्रभाविपणे काम करीत असतो. ग्रामपंचायती आॅनलॉईन करणे, ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे शासनाच्या योजना गावापर्यंत पोहचविणे आदी विविध अभियानात ग्रामसेवकांनी नाविन्यपुर्ण कामे केली आहेत. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न सुटत नाही. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढला आहे. शासनाने आतातरी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतनतृटी दुर करावी, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरावे, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवास भत्ता वेतनासोबत तीन हजार रूपये करण्यात यावे आदी मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा दि.११ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन सोपविले. मोर्च्यात शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विवेक भरणे, पी.आर. भुयार, एन.एस. घोडीचोर, जे.एम. वेदी, अनिल धमगाये, एम.एस. शेंडे, अशोक ब्राम्हणकर, प्रदीप लांजेवार, एन.सी. बिसेन, अमित चुटे, एन.एच. जिरितकर, गोकुळा सानप, वाय.डी. उपरीकर, मंगला डहारे, विलास खोब्रागडे यांच्यासह शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले. (नगर प्रतिनिधी)