शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकावर हल्ला

By admin | Updated: June 9, 2017 00:44 IST

तालुक्यातील इसापूर येथील ग्रामसचिव दत्ता पोहरकर यांच्यावर सुनील चाफले यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याने पोहरकर यांना ...

संघटनेने केला निषेध : कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील इसापूर येथील ग्रामसचिव दत्ता पोहरकर यांच्यावर सुनील चाफले यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याने पोहरकर यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयातून भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुरमाडी तुपकरचे तत्कालीन ग्रामसेवक दत्ता पोहरकर व सरपंच यांनी शासकीय निधीची अफरातफर केला, असा आरोप करून ग्रामपंचायत सदस्य सुनिल चाफले यांनी सदर प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता. तपासात काहीही निष्पन्न न झाल्याने चाफले यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना आत्मदहनाची धमकी देवून पोहरकर यांचे निलंबन करण्यात भाग पाडले. त्यानुसार दत्ता पोहरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तहसिल कार्यालयासमोर ग्रामसेवक पोहरकर यांना चाफले दिसले त्यांनी पोहरकर यांना शिवीगाळ केली व काठीने मारायला सुरवात केली. त्यांना डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फॅक्चर झाला आहे. सदर घटनेची तक्रार लाखनी पोलीस स्टेशन येथे केली आहे. गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चाफले यांनी ग्रामसेवक पोहरकर व सरपंच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून वारंवार पैशाची मागणी करायचे. चाफले यांनी ग्रामपंचायतच्या जागेत अवैध बांधकाम केले होते. मुरमाडी येथील एका राजकीय नेत्याने घरटॅक्स देण्यास टाळाटाळ केली होती. त्या नेत्याकडून टॅक्स वसूल केल्यामुळे ते ग्रामसेवक पोहरकर यांच्यावर नाराज होते. चाफले यांनी प्रामाणिक ग्रामसेवक पोहरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे ग्रामसेवक व कर्मचारी संघटनांनी निषेध केला आहे.यापुर्वी मारहाणीत सुनील चाफले यांना मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाले, अशी तक्रार चाफले यांनी केली होती. दत्ता पोहरकर व चाफले यांनी एकमेकांविरुध्द तक्रारी केल्यामुळे पोलीस तपास महत्वाचा ठरणार आहे.