शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणांची भाकर, वाकळ झाली हद्दपार

By admin | Updated: May 12, 2015 00:31 IST

कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या ...

चपातीचा वाढला आस्वाद ज्वारीचे पीक जिल्ह्यातून गायब होण्याच्या मार्गावरतुमसर : कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या गरिबीचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या या दोन वस्तू आज ग्रामीण भागातून जवळजवळ हद्दपार झाल्या आहेत. आहारात स्वादिष्ट, पचायला हलकी असणारी गरिबांच्या आहारातील भाकरीने अलिकडे श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमात बुफे नावाच्या आधुनिक प्रकारात एखाद्या कोपऱ्यात का होईना स्थान मिळविल्याचे दिसून येते. या भाकरीला अनादिकाळापासून सोबत करणारा झुणका (बेसन) याने मात्र तिची साथ सोडल्याचे दिसून येते. भाकरीची जागा गोल गुबगुबीत चपातीने (पोळीने) घेतलेली आहे. पण जिभेला मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळेच की काय आजही झुणक्यासोबत भाकर हे नाव जोडले जाते. महाराष्ट्रात मागील काही काळ सत्तेवर राहिलेल्या भाजप- सेना युती सरकारने मात्र त्यांचे एकीकरण केले. त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे पाच वर्षे याचे प्रेम विविध फलकावर झळकत राहिले. अशी ही भाकर आता नवीन पिढीसाठी इतिहासजमा झाली. भारतात हरितक्रांती होण्याअगोदर बऱ्याच राज्यात ज्वारीचे पीक मोठया प्रमाणात घेतल्या जायचे. कमीत- कमी पाणी या पिकाला लागत असे. तसेच ज्वारी काढल्यानंतर राहिलेले कुटार, कडबा शेतकर्ऱ्यांच्या पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरल्या जात असे. कालांतराने हायब्रिड ज्वारी नावाचा प्रकार जन्माला आला आणि त्यामुळे मूळ ज्वारी पिकविणे बंद झाले. मुळात भूक या शब्दापासून भाकर हा शब्द तयार झाला असावा. सणासुदी व्यतिरिक्त दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येक घरी भाकर तयार केली जायची. जात्यावर दळलेले पीठ कोहपरात गरम पाण्याने (अंदन) भिजवून त्यापासून भाकर तयार केली जायची. साधारणत: तव्यात मावेल एवढया आकाराची भाकर तयार करण्यात त्या काळातील गृहीणींचा हातखंडा होता. आपल्या धन्याला तव्यावरून काढलेली, काळा पापुद्रा चढलेली भाकर खाऊ घालण्यात वेगळाच आनंद होत असे. याउलट अलीकडे फ्रिजमधून काढलेले थंडे अन्न नवऱ्याला खाऊ घालण्यास काही आधुनिक गृहिणी धन्य मानत असतात. कदाचित यामुळेच आजचे पतिराज एखादेवेळी जेवण करण्यात हॉटेलमध्ये गेल्यानंतर 'गरम रोटी लाओ' असे म्हणत असावेत.आजही ग्रामीण भागातील गावखेड्यात गेले असता बाहेर एखाद्या ठिकाणी ती वाकळ वाळत असल्याने तिचे दर्शन होते. एरव्ही ती शयनकक्षात मोठया गाद्यांच्या किंवा चादरीच्या खालच्या बाजुला दबलेली दिसून येते. जुन्या काळात माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिचा सहवास माणसासोबतच असायचा. मात्र सध्या भाकर व वाकळ ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)जुन्या वस्तूंचा होत असे पुनर्वापरवाकळ, गोधडी, देशमुख या विविध नावाने प्रचलित असणाऱ्या वाकळीची निमिर्ती उन्हाळ्याच्या काळात घरोघरी होत असे. जुने फाटलेले कपडे, जुने धोतर किंवा लुगड्यांवर अंथरून त्याला सुई- धाग्याने शिवून ही वाकळ तयार केली जायची. साधारणत: एक वाकळ विणण्याकरिता ८ ते १0 दिवस लागत असत. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी उन्हाळ्यात गरम न होणारी ही वाकळ प्रत्येकाच्या घरी असायची. त्या काळात ब्लँकेट, चादर, रजई फार कमी दिसायची. परंतु आज या वाकळीची जागा वरील आधुनिक साहित्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागात जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याकडे विशेष लक्ष नागरिक गरीब परिस्थितीमुळे देत असत. मात्र बदलत्या जीवनमानानुसार या सर्व पद्धती बंद होत आहेत.