शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पदभरती प्रक्रियेत घोळ

By admin | Updated: August 2, 2014 23:56 IST

तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिकीची जतन करणाऱ्या ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर येथील कर्मचारी भरती प्रक्रियेत घोळ करण्यात आले आहे. झालेली निवड रद्द करावी व दोषी असलेल्या

जवाहरनगर : तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिकीची जतन करणाऱ्या ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर येथील कर्मचारी भरती प्रक्रियेत घोळ करण्यात आले आहे. झालेली निवड रद्द करावी व दोषी असलेल्या अधिकाऱ्या विरूद्ध कारवाही करण्याची ग्रामस्थ व मुलाखतीला आलेल्या उमेदवाराची मागणी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर अंतर्गत दोन कायम व एक तात्पुर्ता स्वरूपाचे कर्मचारी होते. पैकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती सेवा ज्येष्ठतेनुसार मार्च महिन्यात पदोन्नती होवून ग्रामसेवक म्हणून करण्यात आली. परिणामी एक पद ग्रामपंचायतमध्ये रिक्त झाले. त्या अनुसंघाने लिपीक वसुली कारकुन या रिक्त पदाकरिता १६ जुलै रोजी जाहीरनामा काढण्यात आला. २८ जुलै रोजी १७ उमेदवारांची तोंडी मुलाखतीत घेण्यात आले. यात नव्याने एक ते दोन वर्ष रहिवासी झालेली महिलांची निवड करण्यात आली. पैकी मुलाखतीला आलेल्या उमेदवाराने विचारना केलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे देवून सुद्धा कमी गुण देण्यात आले. निवड झालेल्या उमेदवाराकडे पुरेसे कागदपत्र नसल्याने दोनवेळा घरी पाठविण्यात आले आणि शेवटी त्याच महिलेची निवड करण्यात आली. हा एक नसमजण्यासारखा प्रश्न आहे. यात वसलिेबाजी झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष मुलाखत असताना संगणकावर परिक्षा घेण्यात आली. एकूण गुण पूर्ण देण्याऐवजी अर्धा स्वरूपाचे एकूण गुण देण्यात आले, असा आरोप मुलाखतीमधील उमेदवारांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या पद भरती प्रक्रियासाठी कोणत्याही ग्रामसभेची मंजुरी नाही. यावरून झालेली प्रक्रिया ही नियमबाह्य असल्याचे सिद्ध होते.दरम्यान आज तहकुब असलेली ग्रामसभा घेण्यात आली. विषय सुचीनुसार सार्थक चर्चा करण्यात आली. यात अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावरील हा मुद्दा ग्रामस्थानी उचलुन धरला. यावर सभाअध्यक्ष सरपंच यांनी हा वेळेवर आलेला अर्ज आहे. यावर दोन दिवसांनी वेगळी सभा घेवून त्यात याविषयी माहिती देण्यात येईल. यावर ग्रामस्थ यांनी आजच यावर चर्चा करून निवाडा करण्यात यावा अग्रही मागणी केली. शेवटी अध्यक्षांनी मागणी मान्य केली. दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांना शहापूर येथील सभा असल्याचे सांगून ग्रामपंचायत कार्यालयमधून पलायन केले. यात ग्रामस्थांच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या गाडीला घेराव घातला. गाडीला घेराव घातल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांचा कॉलर पकडून मारण्याचा प्रयत्न केले असता ग्रामस्थानी मध्यस्थी करून प्रकरण निवडण्यात आले. (वार्ताहर)