शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामसभेचा विसर

By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST

पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती.

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती. काही ग्रामस्थानी आपली समस्या घेवून ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. सरपंच व तीन सदस्यांची उपस्थिती पाहून ग्रामस्थ चकीत झाले. एक तास होवून सदस्य उपस्थित झाले नव्हते. ग्रामपंचायत सदस्यांनाच ग्रामसभेचे महत्व माहित नसतील तर गावकऱ्यांना ग्रामसभेचे महत्व कोण सांगणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. ९ सदस्यासह ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. मागील अनेक महिन्यापासून ग्रामपंचायत सदस्यामध्ये आपसी मतभेद पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. गावात समस्येला उधान आले आहे. येथे महिला सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे गावाचा कारभार सांभाळत आहेत. गावात प्रवेश करण्यापुर्वी नाकाला रूमाल बांधावी लागते. आबादी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. घाणीमुळे नाल्या भरलेल्या आहेत. लक्षावधी रूपये खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी धुळ खात आहेत. प्रशासनाकडून वर्षाला चार ग्रामसभा घेतल्या जातात. मात्र ग्रामस्थाच्या अल्प उपस्थितीमुळे ग्रामसभा तहकूब होत आहेत. भविष्यात अशा ग्रामसभा बंद होण्याचे चिन्ह पाहायला मिळत आहेत. ग्रामसभा ही जनतेच्या गावाच्या विकासात्मक कामासाठी असते. मात्र ही जाणीव जनतेमध्ये दिसत नाही. पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे जनता विकासापासून कोसो दूर आहे. (वार्ताहर)