शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शासन शेतकऱ्यांचे हित जोपासते

By admin | Updated: June 8, 2017 00:28 IST

शेतामध्ये जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात व्हाव्या यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदणे, जलशिवाराच्या माध्यमातून पाण्याचा संचित साठा वाढविण्यात येत आहे.

राजकुमार बडोले : शिवार सभांमधून ग्रामस्थांशी हितगूजलोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतामध्ये जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात व्हाव्या यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदणे, जलशिवाराच्या माध्यमातून पाण्याचा संचित साठा वाढविण्यात येत आहे. एकंदरीत मागील अडीच-तीन वर्षामध्ये सरकारने राबविलेल्या लोकोपयोगी योजनामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा निश्चित हित जोपासला जाणार असा आशावाद राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनांतर्गत भाजपा सरकारने केलेल्या कामाची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी शिवार सभांच्या माध्यमातून इंझोरी, निमगाव येथील ग्रामस्थांशी हितगूज साधतांना बडोले े बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावातील शेवटच्या टोकावरील गरजू लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही. गावखेड्यातील गरिबातला गरीब व्यक्ती विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना विस्ताराने गावपातळीवरील सामान्य माणसाच्या दारापर्यंत जाण्यासाठी शर्र्तीेचे प्रयत्न केल्या जात आहे. शेतामध्ये काबाडकष्ट करणारा शेतकरी सशक्त होऊन कर्जपाशातून मुक्त होण्यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मदतीची साथ देत आहे. गावामध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. इंझोरी येथील भाजपाचे महासचिव लायकराम भेंडारकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाप्रसंगी ना. राजकुमार बडोले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचना गहाणे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे, विनोद नाकाडे, तालुका भाजपाध्यक्ष उमाकांत ढेंगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, चत्रूभाऊ भेंडारकर, होमराज ठाकरे, केवळराम पुस्तोडे, संदीप कापगते यांची उपस्थिती होती.