गोसेबुज : गोंदिया जिल्ह्यातील कालीसराड धरणाचे दारे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या येणाऱ्या प्रवाहात वाढ होत आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे रात्री उशिरापर्यंत अर्ध्या मिटरने उघडण्यात येणार आहेत. सध्या गोसीखुर्दचे १७ वक्रदारे अर्ध्या मिटरने उघडली जाणार आहेत.मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कालीसराड धरणाचे दारे उघडल्यामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह वाढणार आहे. वैनगंगेचा जलस्तर वाढून तो पाण्याचा प्रवाह गोसीखुर्द धरणात रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका होवू नये या करिता रात्रीपर्यंत गोसीखुर्द धरणाची सर्व द्वारे अर्ध्या मिटरने उघडली जाणार आहेत.
रात्री उघडणार गोसेखुर्दचे दरवाजे
By admin | Updated: August 5, 2014 23:20 IST