शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

गोसेखुर्द कालव्याची कामे संथगतीने

By admin | Updated: May 3, 2015 00:41 IST

विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या ...

शेतकरी संकटात : पाणी मिळण्याची आशा मावळलीआसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधकामाची कामे संथ गतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.१९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटींच्या वर गेली आहे. दोन तपे व मुळ धरण्याच्या किमतीत २० पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांपर्यंत या धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेताला पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडी ज्या प्रमाणे शिजावी, त्याप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती होत आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोटी टी.एम.सी. पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला अजिबात होताना दिसत नाही. आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमिटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावात जमा होणार आहे. यात १२० दशलक्ष घनमिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार असून ६४ हजार ३६२ हेक्टर शेतीचे सिंचन होण्याची शक्यता आहे. परंतु या कालव्याचे काम अजून पूर्णत्वाकडे गेलेले नसल्याने सिंचनाचा फायदा होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच आसोला मेंढा तलावातील पाण्याच्या साठ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावाचे पुनर्वसनाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कालव्यातून पाणी इतक्यात वाहून नेणे शक्य नाही. असेच दिसत आहे.दुसऱ्या महत्वाच्या डावा कालव्याचे बांधकामच वादाच्या व भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. हा कालवा गोसे पासून लाखांदूरपर्यंत जात आहे. या कामाची लांबी २२.९३ किलोमिटर आहे. तर सिंचन क्षमता ४० हजार २०६ हेक्टरची आहे. या कालव्याचे काम उच्च प्रतिचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम सिंचन महामंडळाने सुरु केले आहे.नव्याने बांधकाम लागत असल्याने आतापर्यंत या कामावर झालेला संपूर्ण खर्च वाया गेला आहे. या कालव्याची ४४१ कोटी अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. मात्र एवढे होऊनही शेतकऱ्यांना या कालव्याचा शेतकऱ्यांसाठी सिंचन उपयोग होताना दिसत नाही. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)