शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सद्भावना रॅली

By admin | Updated: September 6, 2014 01:36 IST

समाजात सलोखा, शांतता, बंधुता व एकता कायम राखणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्याचे पालन सुध्दा जनतेने करावे.

भंडारा : समाजात सलोखा, शांतता, बंधुता व एकता कायम राखणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्याचे पालन सुध्दा जनतेने करावे. समाजात सद्भावना निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेला हा सद्भावना रॅलीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश जी. जे. अकर्ते यांनी व्यक्त केले.जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हयात शांतता व सुव्यवस्था तसेच धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी आज सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये रॅलीचा शुभारंभ जी. जे. अकर्ते यांनी हिवरी झेंडी दाखवून केला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक कैलास कणसे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बंसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपविभागीय अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, नगर परिषद प्रशासन प्रकल्प अधिकारी विजय देवळीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गोरे, जिल्हा कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते.ही सद्भावना रॅली लालबहादूर शास्त्री चौकातून हेडगेवार चौक, बजरंग चौक, मस्जीद, मुस्लीम लायब्ररी चौक, पोस्टआॅफीस चौक, बसस्थानक या मार्गे शिवाजी स्टेडियम येथे पोहोचली. रॅलीमध्ये एकतेचा संदेश देणारे पारंपारिक वेशभुषेतील तसेच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका साकारलेले विद्यार्थी, शाळांचे विद्यार्थी, स्काऊट, राष्ट्रीय छात्र सेना, शिक्षक तसेच इतर प्रशासकीय अधिकारी, पोलीस बॅन्ड पथक यांचा समावेश होता. या रॅलीमध्ये वाजत असलेल्या देशभक्तीपर गितांनी शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण केले होते. चौका-चौकातून अनेक लोक रॅलीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होत होते.शिवाजी स्टेडियमला रॅलीचा समारोप करतांना जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये एकमेकांप्रती, निसर्गाविषयी तसेच पशुप्राण्याविषयी सदृभावना निर्माण व्हावी हा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या रॅलीचे आयोजन केले आहे. देशाच्या विकासासाठी शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आज रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हा अनुभव कायम स्मरणात ठेवावा. देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. मोठे झाल्यानंतर देशाचा विकास करतांना ही सद्भावना तुम्हाला प्रेरणा देईल. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी सर्वांचे आभार मानले. या रॅलीमध्ये शहरातील १० शाळांचे १ हजार विद्यार्थी, ७५ स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते.