शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

समाधान शिबिराच्या धरतीवर आनंद मेळावा

By admin | Updated: July 19, 2016 00:33 IST

राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सरळ घेता यावा यासाठी महसूल विभागाने समाधान शिबिराचे आयोजन केले.

काशीवार यांचा पुढाकार : लाखांदूर पहिला मेळावा संजय साठवणे  साकोलीराज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सरळ घेता यावा यासाठी महसूल विभागाने समाधान शिबिराचे आयोजन केले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळावा यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी आनंद मेळावा या नवीन उपक्रमाचे आयोजन सुरू केले आहे. याचा पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे करण्यात आला. महसूल विभागामार्फत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात जसे लाभार्थ्यांना राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आरोग्य सेवा यासह विविध योजनांचा लाभ थेट समाधान शिबिरात देण्यात येतो. या शिबिरात प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यात या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला. मात्र या समाधान शिबिरात जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील बऱ्याच योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी व सामान्य माणसांना वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे चकरा माराव्या लागतात. परिणामी लोकांची कामे खोळंबली व भ्रष्टाचार फोफावत आहे. यावर आळा बसावा, शासनाच्या विविध योजना लोकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आ.बाळा काशीवार यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा आनंद मेळाव्याचे आयोजन केले. याचा पहिला प्रयोग लाखांदूर येथे करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला.असा आहे आनंद मेळावाया आनंद मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाची उपस्थिती राहणार असून यात घरकुल योजना, शौचालय बांधकाम, शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदानावर मिळणारे साहित्य वाटप, सोवर कंदील, मुलींना सायकल वाटप यासह अन्य योजनांचा लाभ या आनंद मेळाव्यात मिळणार आहे.भ्रष्टाचाराला आळा बसेलबरेचदा लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागतात. संबंधित कर्मचारी चिरीमीरी घेऊन लाभार्थ्यांना लाभ देतात. यामुळे भ्रष्टाचार होऊन खरा लाभार्थी हा योजनेपासून वंचित राहतो. शासनाचा हेतु साध्य होत नाही.कामात पारदर्शकता येईलशासनाच्या विविध योजना लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. मात्र अधिकारी व कर्मचारी यामुळे या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गरीब हा गरीबच राहतो व श्रीमंत हा अधिक श्रीमंत होतो. त्यामुळे आपण हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू केला असून शासनाच्या सर्व योजनाचा लाभ आता लाभार्थ्यांना मिळणार असून हे आनंद मेळावे प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात घ्यायचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा.- बाळा काशीवार, आमदार साकोली.