चिचाळ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही ट्रॅक्टर्स, जीप, दुचाकीमध्ये केरोसीनचा सर्रास वापर होत आहे.
रॉकेलचा
गरजू
गावातील
मात्र
या
संदर्भात वारंवार तक्रारी करूनही दोषीवर कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर) खासगी वाहन धारकांना रात्री दिवसा सर्रास बिना रॉशन कार्डने ३५ ते ४0 रूपये या चढय़ा भावाने रॉकेल विकले जात आहे. डिझेलचे भाव वाढल्याने बहुतांश ट्रॅक्टर्स मालकांचा रॉकेल वापरण्यावर अधिक भर आहे. दक्षता समिती गावात ऐवढा जनतेची ओरड असतानाही दक्षता समितीचे सदस्य कधीच त्या रॉकेल विक्रेत्याला भेटतानाही दिसत नाही. कारण त्याचे पहिलेच तोंड बंद केले जातात, असे त्रस्त ग्राहकांची म्हणणे आहे. नागरिकांना केरोसीनचा पुरवठा होत नाही. मात्र ट्रॅक्टर मालकांना ते सहजतेने उपलब्ध करून दिले जाते. याचे कारण अर्थकारणात दडलेले आहे. चिचाळ येथे तीन रॉकेल परवानाधारक असून तिन्ही परवानाधारक विक्री करताना तीन रॉकेल विक्रेते प्रती राशन कार्डला २ लीटर तर कुणी ३ लीटर तर तिसरा रॉकेल विक्रेता ४ लीटर प्रमाणे कार्डधारकांना रॉकेलची विक्री करतो. तीन दुकाने शासकीयच असताना तीन दुकानात वाटपात तफावत का येतो, असा प्रश्न जनतेत दबक्या आवाजात होत आहे. काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी संबंधित दुकानदारांकडून कृत्रिम टंचाई केली जात असून सर्वसामान्य नागरिकांना केरोसीन उपलब्ध होत नाही. याकडे तालुका पुरवठा विभाग डोळे झाक करीत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे.