शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणीचे महाप्रबंधक पोलीस चौकशीसाठी अनुपस्थित

By admin | Updated: December 22, 2016 00:45 IST

भंडारा आयुध निर्माणी येथील स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असताना तीन ट्रक चालकांकडे स्फोटक पदार्थाच्या वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी त्यांना पकडले.

विनापरवाना स्फोटक वाहतूक : जवाहरनगर येथे गुन्हा दाखल जवाहरनगर : भंडारा आयुध निर्माणी येथील स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असताना तीन ट्रक चालकांकडे स्फोटक पदार्थाच्या वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी त्यांना पकडले. याप्रकरणी तीन ट्रकचालक, एम.टी.सेक्शनप्रमुख व स्फोटक वाहन सुरक्षारक्षक चौकशीला सामोरे गेले. मात्र महाप्रबंधक चौकशीसाठी पळवाटा शोधत असून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आले नाही. पोलीस सूत्रानुसार, भंडारा आयुध निर्माणी येथील स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असताना ट्रक क्र. एम.एच. ३६ के १३२, एम.एच. ३६ के १३३ व एम.एच. ३६ के १६५ या ट्रकचालकांला चौकशीदरम्यान स्फोटक पदार्थ वाहतुकीला परवाना नसताना १९ डिसेंबर रोजी अडविण्यात आले. चौकशीसाठी तिन्ही ट्रक चालक एम.टी. सेक्शन प्रमुख, स्फोटक वाहन सुरक्षा रक्षक, महाप्रबंधकांना १६० कलमान्वये जवाहरनगर पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यातील चालक, सेक्शनप्रमुख,स्फोटक वाहन सुरक्षारक्षक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर झाले. मात्र महाप्रबंधक ई.आर. शेख हे २१ डिसेंबर उपस्थित झाले नाही. याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागलेले आहे. वसाहतीबाहेरील रिंग रोडने गेट क्रमांक ३ वरून स्फोटक पदार्थ वाहतूक करणारे ट्रक बाहेर पडतात. लगेच पोलीस ठाण्यासमोर वाहन परीक्षण दस्ताऐवज पूर्ण झाल्यावर पुढील गंतव्य स्थानाकडे रवाना होत असतात. मात्र यावेळी गेट क्रमांक ३ वरून बाहेर न पडता सर्व तिन्ही ट्रक पोलीस ठाणे वगळून गेट क्रमांक १० वरून तेही घनदाट वसाहतीमधून स्फोटक पदार्थ असलेले ट्रक बाहेर कसे निघाले हा चर्चेचा विषय झाला आहे. साहुली गेट बंद करणे, ओव्हरटाईम बंद करणे, महाप्रबंधक संघटना, कर्मचारी व व्हीजीटर यांच्या सुसंवादाचा अभाव, परिणामी संबंधित वरिष्ठ सुरक्षा विभाग महाप्रबंधकावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. (वार्ताहर)