शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री बोरवेल्सला ७० हजारांचा दंड

By admin | Updated: August 2, 2014 23:56 IST

शहरातील रुक्मीणी नगरातील जयगोपाल गायधने यांनी गायत्री एजन्सीज बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून घरी बोरवेल खोदली होती. त्याकरीता निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले.

ग्राहक मंचचा निकाल : निकृष्ट साहित्य पुरविल्याचा फटकाभंडारा : शहरातील रुक्मीणी नगरातील जयगोपाल गायधने यांनी गायत्री एजन्सीज बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून घरी बोरवेल खोदली होती. त्याकरीता निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले. याप्रकरणी गायधने यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली असता ग्राहक मंचने गायत्री बोरवेल्सचे उमेश बडवाईक यांच्याविरुद्ध निकाल देताना गायधने यांना ७० हजार रुपयांची भरपाई देण्याचा दंड ठोठावला.रुक्मीणी नगरातील जयगोपाल गायधने यांनी स्वत:चे घरी उमेश बडवाईक यांच्या गायत्री एजन्सीज बोरवेल अँड मशिनरी च्या माध्यमातून केसींग पाईपसह बोरवेलचे काम २०१२ मध्ये केले. यात २४६ फूट खोदकाम करण्यात आले. त्यात २१० फुटावर पाणी लागले. याकरीता बडवाईक यांनी २७० फुट केसींग पाईप स्वत:च्या दुकानातून विक्रीस दिले. या बदल्यात ४६ हजार ८६० रुपये गायधने यांच्याकडून घेण्यात आले. यासोबतच भाष्कर तिघारे यांच्या ओम साई इलेक्ट्रीक अँड मशिनरी या दुकानातून १९ हजार ४१० रुपये किंमतीचा सबमर्सिबल पंप घेण्यात आला. काही दिवस सुरळीत गेले. सहा महिन्यानंतर बोरवेलमधून गढूळ पाणी येऊ लागल्याने गायधने याची तक्रार तिघारे व बडवाईक यांच्याकडे केली. याबाबत तिघारे यांनी गायधने यांची तक्रारीची पुष्टी करण्याच्या दृष्टीने सबमर्सीबल बाहेर काढले. यावेळी बडवाईक यांच्याकडून टाकण्यात आलेल्या दोन केसींग पाईपचे तुकडे आढळले. यावरुन बडवाईक यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप दिल्याचे स्पष्ट झाले. याबाबत गायधने यांनी वारंवार गायत्री बोरवेल्सचे बडवाईक यांच्याकडे खेटा घातल्या. मात्र त्यांनी नेहमी उडवाउडवीचे उत्तरे देऊन गायधने यांना केसींग पाईप बदलवून देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी त्यांनी ग्राहक तक्रार मंचकडे तक्रार दाखल केली. यात तक्रार मंचचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्या गीता बडवाईक, हेमंतकुमार पटेरिया यांच्या गणपूर्तित सर्व साक्षपुरावे व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात गायत्री बोरवेल्सचे उमेश बडवाईक यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप पुरवठा केल्याचे सिद्ध झाले. यामुळे त्यांच्याविरुद्ध अंतिम निर्णय देताना गायधने यांना नुकसान भरपाईपोटी ३० हजार रुपये, तक्रार दाखल केल्यापासून आठ टक्के व्याज दराने द्यावे, सबमर्सीबल पंप व त्याला लागणारे साहित्याचे नुकसान भरपाई म्हणून १९ हजार ४१० रुपये, मानसिक त्रासापोटी १५ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये असे ६९ हजार ४१० रुपये ३० दिवसाचे आत देण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयाने बोरवेल्स चालकांचे धाबे दणाणले असून गायधने यांच्याकडून अ‍ॅड.हरडे यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)