शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भैयालाल भोतमांगे यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: January 22, 2017 00:19 IST

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात मोहाडी तालुक्यातील देऊळगाव या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

भंडाऱ्यात शोकसभा : शोकाकूल वातावरणभंडारा : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात मोहाडी तालुक्यातील देऊळगाव या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.भैयालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला हृदयविकाराने नागपुरात निधन झाले. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव भंडारा येथे आणण्यात आले होते. न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी मोठा संघर्ष केला. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्यांच्या निधनामुळे एका संघर्षाची अखेर झाल्याची भावना आंबेडकरी अनुयायांमधून व्यक्त होत होती.कुटुंबीयांच्या समाधीशेजारीच केले अंत्यसंस्कार२९ सप्टेंबर २००६ च्या रात्री झालेल्या हत्याकांडात भोतमांगे कुटुंंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पत्नी सुरेखा, मुलगा सुधीर व रोशन मुलगी प्रियंका यांच्या पार्थिवावर देऊळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या समाधी शेजारीच भैयालाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेनंतर भैयालाल यांच्या न्यायाच्या संघर्षात संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्या पाठिशी होता. त्यांच्या अखेरच्या क्षणी सुद्धा याच सहकाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला.११ वर्षापूर्वी घडले होते अमानुष हत्याकांड२९ सप्टेंबर २००६ रोजी मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या छोट्याशा गावातील भोतमांगे कुटुबीयांवर गावातील काही लोकांकडून अमानुष हत्या केली होती. आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची अमानुष हत्या केली होती. या हत्याकांडाचे पडसाद विधीमंडळापासून संसदेपर्यंत उमटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलनाचे लोण पसरले होते. घटनेनंतर सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि १५ महिने चाललेल्या या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. याप्रकरणी न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरविले. न्यायासाठी यांनी अखेरपर्यंत लढा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यामुळे चळवळीला हानी पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)