शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनीच केला मित्राचा घात

By admin | Updated: November 30, 2015 00:41 IST

येथील शादाब सलीमबेग मिर्झा या युवकाचा पाहूणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी शादाबच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर घातपाताचा आरोप केला आहे.

कुटुंबीयांचा आरोप : चौकशीची मागणी, वरिष्ठांना निवेदनभंडारा : येथील शादाब सलीमबेग मिर्झा या युवकाचा पाहूणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी शादाबच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर घातपाताचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी शादाबचे वडील सलीमबेग मिर्झा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.येथील संत तुकडोजी वॉर्डातील शादाब सलीमबेग मिर्झा (२४) या युवकाचा ११ आॅक्टोबर रोजी पाहुणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. त्यानंतर शादाब हा रोहीत प्रभाकर घोरपडे रा. बैरागीवाडा भंडारा व सुरज जयराम शाहू रा. वरठी यांच्यासोबत सातोना येथे गेला होता.सातोना येथील एका पान टपरीवर शादाबला त्याची दुचाकी ठेवून देण्याचे सांगत सुरज शाहुच्या स्कुटीवर तिघेही पाहुणी नहराकडे गेले. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यानंतर शादाब नहरात पडला व बुडाला, असे त्याच्या मित्रांचे बयान आहेत. परंतु, त्याच्या मित्रांनीच त्याला नहरात ढकलले, असा आरोप सलीमबेग मिर्झा यांनी केला आहे. शादाबच्या मित्रांनी एका निर्जनस्थळी शादाबला घेऊन का गेले, शादाबसोबत त्यांचे काय वैमनस्य होते, याबाबत खुलासा व्हायला हवा. पोलिसांनी मित्रांचे फक्त बयान घेऊन सोडून दिले. तेव्हा या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, शादाबच्या मित्रांची नार्काे चाचणी करण्यात यावी, अशी मागणी सलीमबेग मिर्झा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. (नगर प्रतिनिधी)