शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियानाचा फज्जा !

By admin | Updated: April 15, 2015 00:46 IST

जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही.

पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली : कृती आराखड्याने काय साध्य होणार?पवनी : जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही. परिणामी, पावसाळ्यात कोसळणारे पाणी वाहून जात असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद आहे. भंडारा जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात प्रकर्षाने जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी २००२ ला छतावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत साठविण्यासंदर्भात जलपुनर्भरण मोहिमेसंदर्भात आदेश निर्गमित केले आहे.विशेषत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषद, ग्रामपंचायती यासह इतर प्रशासकीय कार्यालयांना हा उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत एकही कार्यालय या उपक्रमाची चोख अंमलबजावणी करताना दिसत नाही. प्रशासकीय कार्यालयांप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनीही जलपुनर्भरण मोहिमेला दुय्यम स्थान दिले आहे. नव्याने घर उभारताना शेकडो फुट बोअरवेल खोदल्या जात आहेत; पण छतावरून पडणारे पावसाचे पाणी त्यात साठविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीवरून वाहून जात आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याच्या प्रारंभीच अनेकांच्या बोअरवेल, हातपंप, विहिरी कोरड्या पडत आहेत. यावर्षीही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्याची ही तात्पुरती सोय ठरते. त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलपुनर्भरणाशिवाय गत्यंतर नसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)जलपुनर्भरणाचे महत्त्वछतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेलजवळ खड्डा खोदून साठविल्यास बारमाही पाण्याकरिता इतर कुठल्याही स्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणार्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीची धूप रोखण्यास बहुतांशी मदत मिळते.