शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आगीत चार जनावरे होरपळली

By admin | Updated: May 28, 2016 00:36 IST

पवनी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेया शिमनाळा येथे शेतकरी नाना देशमुख व रामदास देशमुख यांच्या मालकीच्या तणसीच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली.

तणसीचे ढिगारे जळाले : आर्थिक मदतीची मागणीपालोरा : पवनी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेया शिमनाळा येथे शेतकरी नाना देशमुख व रामदास देशमुख यांच्या मालकीच्या तणसीच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. यात चार ट्रॅक्टर तणीस, एक बंडी, आंब्याचे झाड व चार जनावरे जळाले. बंडी पुर्णता जळून राख झाली असून शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.येथील शेतकरी जनावरांच्या वैरणाकरिता गावालगत असलेल्या खाली जागेवर तनसीचे ढिगारे ठेवीत असतात. तिथेच मोठे आंब्याचे वृक्ष असल्यामुळे सावलीचा आसरा घेत जनावरे बांधतात. आताच शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची चुरणी करुन तनसीचे ढिगारे ठेवले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजता एकाएकी आग लागल्यामुळे ग्रामस्थांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकाने वाटेल त्या पध्दतीने पाण्याची सोय केली. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. वेळीच येथील रेतीघाट मालकांनी परिस्थिती लक्षात घेता वेळीच ट्रॅक्टरवरील पाण्याची टाकी पाठविली होती. त्यामुळे आग आटोक्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा संपूर्ण तणसीचे ढिगारे जळून खाक झाले असते असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.यात नाना देशमुख शिमनाळा यांच्या सात गाई आगीच्या कचाट्यात सापडून गंभीर जखमी झाल्या. यात चार गाईची प्रकृती अति गंभीर आहे. रामदास देशमुख यांच्या मालकीची बैलगाडी व तणीस जळाली आहे. वेळीच येथील पशुवैद्यकीय अधिकारी ए.एस. वरकटे यांनी जनावरांवर उपचार सुरु केले. येथील तलाठी गडले यांनी घटनास्थळी चौकशी करुन एक लाख रुपयाची नुकसान पंचनाम्यात दाखविली आहे. आता जनावरांची वैरण कुठून आणवे कर्ज कसे फेडावे अशा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. विहीरगाव येथे घराला आगउसर्रा : मोहाडी तालुक्यातील ग्राम विहीरगाव येथील घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी विहीरगाव निवासी किशोर धर्माजी गोमासे यांचे घराला अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येऊन गावकऱ्यांनी तुमसर नगरपरिषदेची अग्निशामक दल बोलविण्यात आले. तोपर्यंत घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित कुटुंबाने केले आहे. दरम्यान तलाठी विहीरगाव यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. (वार्ताहर)