शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग ‘जय’च्या तर पोलीस नक्षलवाद्यांच्या शोधात

By admin | Updated: August 2, 2016 00:31 IST

सध्या साकोली तालुक्यात वनविभाग व पोलीस प्रशासनाची शोधमोहिम जोरात सुरु आहे.

शोधमोहीम सुरूच, सुगावा लागेना : राज्यातील वन अधिकारी-कर्मचारी काढताहेत जंगल पिंजूनसंजय साठवणे साकोलीसध्या साकोली तालुक्यात वनविभाग व पोलीस प्रशासनाची शोधमोहिम जोरात सुरु आहे. वनविभाग जयच्या शोधात तर पोलीस प्रशासन नक्षलवाद्याच्या शोधात रात्रंदिवस फीरत आहेत. मात्र वनविभागाला जय चा शोध लागला नाही तर पोलिसांना नक्षलवाद्यांचा शोध लागला नाही. कोट्यवधीचा खर्च झाला व होतच आहे मात्र शोध पथक शोधकार्यात व्यस्तच आहेत.मागील चार महिन्यापासुन वनविभाग जय या वाघाच्या शोधात आहेत. जय हा उमरेड कऱ्हांडला या राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पातून बेपत्ता झाला. या जयच्या बाबतीत अनेक चर्चा सुरु आहेत. कुणी म्हणतात जय इकडे गेला असेल तर कुणी म्हणतात तिकडे गेला असेल जशी माहिती वनविभागाला मिळते त्याच दिशेने वनविभाग जयच्या शोधात फिरताना दिसतात. एवढेच नाही तर जय चे माहेरघर हे नागझीरा अभयारण्य असल्याने जय नागझीरा अभयारण्य तर आला नसावा. याही अंदाजान्वये जयचा शोध घेणे सुरू आहे. एवढेच नव्हे तर नागझीरा व नवेगावबांध या व्याघ्रप्रकल्पात जय च्या शोधासाठी वनविभागाने चक्क हाय अलर्ट केले होते. जयच्या शोधासाठी अख्खे वनविभाग कामाला लागले आहे. एवढी शोधाशोध सुर ुअसुनही जय चा शोध लागला नाही. त्यामुळे वनविभागाची सुरक्षा कीती हा संशोधनाचा विषय ठरला आहे व याचे उत्तरही वनविभागालाच दयायचे आहे.इकडे जय चा शोध सुरु असतांनाच साकोली तालुक्यात पोलिसांना माहिती मिळाली की वडेगाव येथील भिमलकसा तलावाच्या पाळीवर झोपडीत नऊ नक्षलवादी येऊन गेले. माहिती मिळताच अख्खा जिल्ह्यातील पोलिसांनी वडेगाव परिसरातील जंगल पिंजून काढले. मात्र पोलिसांनाही नक्षलवाद्यांचा शोध लागला नाही. घटनेचा आठवडा उलटला मात्र पोलीस नक्षलवाद्याचा शोध घेतच आहेत. सध्या साकोली तालुक्यात वनविभाग जयच्या तर पोलीस नक्षलवाद्यांचा शोधासाठी फिरत आहेत.