शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळ जमिनीवर फुलले १७ हजार वृक्षांचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:12 IST

जेथे गवतही उगवू शकत नाही अशा खडकाळ आणि ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविले, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र तुमसर वनविभागाच्या कामगिरीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर तुम्हाला मोहगाव (करडी) येथे जावे लागेल. सध्या या ठिकाणी १७ हजार ७७६ झाडे आठ मीटर पर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमोहगाव येथील प्रयोग : तुमसर वनविभागाची कामगिरी, नियोजनबद्ध पद्धतीने केले वृक्षारोपण

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जेथे गवतही उगवू शकत नाही अशा खडकाळ आणि ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविले, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र तुमसर वनविभागाच्या कामगिरीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर तुम्हाला मोहगाव (करडी) येथे जावे लागेल. सध्या या ठिकाणी १७ हजार ७७६ झाडे आठ मीटर पर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे.मोहगाव करडी येथे १५ हेक्टर वनक्षेत्र खडकाळ व ओसाड होते. कोणत्याही प्रकारचे खुरटे गवत वा रोपटे तिथे जगू शकत नव्हते. संपूर्ण भाग मुरमाने व्यापलेला होता. अनेक वर्षापासून जमीन पडीक असल्याने शेती करायचेही धाडस करत नव्हते. पाण्याचा अभाव आणि मोठ्या प्रमाणात उतार असल्याने पाणीही थेट वाहून जात होते. परंतु अशा खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलविण्याचा निश्चय तुमसर वनविभागाने केला. दोन टप्प्यात १६ हजार हेक्टरवर १७ हजार ७७६ वृक्षांची लागवड वनीकरण विभागाच्या कोम्पा अंतर्गत करण्यात आली. दोन वर्षात या रोपवनाची चांगलीच वाढ झाली आहे. सध्या ही झाडे आठ फुटापर्यंत वाढल्याचे दिसून येते. यासाठी तत्कालीन सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी बाबा चोपकर यांचे परिश्रम कामी आले. वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी, सहाय्यक उपवनसंरक्षक पी.जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात मिश्र रोपवन फुलविण्यात आले. त्यासाठी बीटगार्ड तांदळे, वनकर्मचारी विनायक शेंडे यांनी परिश्रम घेतले. २०१७ मध्ये तीन बाय तीन मीटरवर वृक्षारोपण करण्यात आले. अत्यंत नियोजनबद्धरित्या वृक्षारोपण करण्यात आले.मोहगाव येथील रोपवनासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड करण्यात आली. वृक्ष जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. त्याचाच परिणाम म्हणून आज खडकाळ जमीन आज हिरवीगार झाली आहे.-पी.एन. कावळे, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी तुमसर.