शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

खाद्यपदार्थ उघड्यावर आरोग्याची ‘ऐसीतैसी’

By admin | Updated: September 10, 2014 23:27 IST

गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा

भंडारा : गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा न करता पोटपुजा करताना दिसतात. पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नानाविध आजारांना आमंत्रण मिळत असते. असे असतानाही खाण्याचा मोह आवरता येत नाही. आजारांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे.वैद्यकीय सुत्रानुसार ७० टक्के पोटाचे आजार हे उघड्यावरील अन्न खाल्लयाने हात असतात. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. दुसरीकडे उघड्यावर खाद्यान्न विकणाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने हा प्रकार सर्रास सुरू आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे खाण्याच्या पद्धतीही बदलल्या. आज ठिकठिकाणी खानावळी, हॉटेल्स, रेस्टॉरेंट थाटण्यात आलेली आहेत. पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध असलेले विविध पदार्थही मेजवाणीसाठी तयार असतात. चिभेची चव बदलण्यासाठी प्रत्येक कुटूंब या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. परंतु, आपण जे खात आहोत ते कितपत योग्य आहे, याची माहिती कुणालाही नसते. जिल्ह्यात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अन्न सुरक्षा मानक कायद्यातील निकषांचा विचार करावयास पाहिजे. परंतु, जिल्ह्यात या कायद्याचा कुणीही विचार करीत नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. मागीलवर्षी अन्न व औषधी विभागाच्या नागपूर येथील चमूने जिल्ह्याचा दौरा करुन हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरेंटमधील पाहणी केली होती. त्यातील अनेक जणांकडे व्यवसाय करण्याचा परवाना नव्हता. तेव्हा त्यांच्याकडून परवाना तसेच दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर ही मोहिम राबविण्यात आली नाही. जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी खाद्यांनांचे दुकाने थाटण्यात आली आहेत. त्या दुकानांना परवाने आहेत किंवा नाही याची तसदी अन्न व औषधी विभागाने कधी घेतली नाही. शिवाय या दुकानांमध्ये वापरण्यात येणारे अन्न पदार्थ, पाणी यांची गुणवत्ता काय, याचाही विचार करण्यात आलेला नाही. या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी नोंदणी व परवाने तयार करण्यावरच अधिक भर देत आहे. नियमाप्रमाणे अन्न पदार्थ व विक्र ीचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्याठिकाणी वापरण्यात येणारे पिण्याचे पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेतून तपासून घेण्यात यावे, ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची विक्र ी असते त्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी ठेवावे आदी निकष आहेत. परंतु, यापैकी एकाही निकषांची पुर्तता केली जात नाही. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. याकडे नागरीकांनी लक्ष द्यायला हवे, तरच जागृती निर्माण होईल. (प्रतिनिधी)