शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

३२ कुटुंबांतील अनाथ बालकांना अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST

जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून ३२ कुटुंबांतील अनाथ मुुला-मुलींना सौंदड येथे आणण्यात आले. अनिल मेश्राम यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातून जमलेल्या अनाथ मुलांना अन्नधान्यासह ...

जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून ३२ कुटुंबांतील अनाथ मुुला-मुलींना सौंदड येथे आणण्यात आले. अनिल मेश्राम यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातून जमलेल्या अनाथ मुलांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. सविता बेदरकर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार उषा चौधरी, जगदीश लोहिया, माजी उपसभापती दामोधर नेवारे, मधुसूदन दोनोडे, सुखलाल मेश्राम, नायब तहसीलदार बी. टी. यावलकर, सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे, नीलिमा मेश्राम, अजित कांबळे, भगवान नंदागवळी, ए. बी. कडू, दिलीप राऊत, राजू वैश्य, लक्ष्मी अग्रवाल, रामचंद्र भेंडारकर, राजेंद्र मेश्राम उपस्थित होते. सर्वांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्या अडचणी उपस्थित दानदात्यांनी अवगत केल्या. मोठा धीर देऊन जन्मदात्यांची एकप्रकारे जोड दिली.

जीवन जगताना त्यांना कोणती कमतरता जाणवणार नाही म्हणून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम, थोर पुरुषांचे चरित्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

शिक्षणामुळेच परिस्थितीवर मात करता येईल

nस्वत:ला अनाथ समजू नका, आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत, काही झाले तरी विपरीत परिस्थिती समोर आली तरीसुद्धा शिक्षणात खंड पडू देऊ नका. शिक्षणच तुमचे भाग्य ठरविणार आहे. परिस्थितीशी संघर्ष करण्याची क्षमता ठेवा, मनात मोठे ध्येय ठेवा. जन्मदात्यांचे छत्र काळाने हिरावून घेतले असले तरी आमचा मायरूपी हात तुमच्यासोबत आहे, असा हितोपदेश करून उपस्थितांनी पालकत्वाची जोड दिली.

अनेकांनी उचलला खारीचा वाटा

nजिल्ह्यातील ३२ अनाथ मुलांना मदतीचा हात देऊन जन्मदात्यांची उब देण्यासाठी अनेकांनी स्वेच्छेने खारीचा वाटा उचलला. यात शिल्पा सोनाले, उषा चौधरी, जगदीश लोहिया, रमेश खंडेलवाल, डॉ. विवेक मेश्राम, पी. आर. कापडे, अमित कांबळे, राहुल मडावी, ललितकुमार अग्रवाल, उमराव वागधरे, बाबादास येरोला, संदीप मोदी, बलवीर राऊत, आर. एस. डोये, सुखदास मेश्राम, काळे, ए. बी. कडू, बी. टी. यावलकर, आत्माराम गहाणे, धनरुप उके, दामोधर नेवारे, संतोष जगणे, ठाकूर किराणा, हितेंद्र रंगारी, आर. व्ही. मेश्राम, जी. एस. कावळे, कमलेश चुऱ्हे, दिलीप राऊत, राजेंद्र अग्रवाल, गायत्री इरले, राजू वैश्य, हेमंत निमजे, टी. बी. सातकर यांचा समावेश आहे.