शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

By admin | Updated: January 8, 2017 00:29 IST

निवडणूक आयोगाने नागपूर शिक्षक मतदार संघाचे द्विवार्षिक निवडणूक घोषित केली असून सदर निवडणुकीची आचारसंहिता भंडारा जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

जिल्हाधिकारी यांचे आवाहन : प्रत्येक तालुक्यात भरारी पथकजिल्ह्यात ३ हजार ६९९ मतदार, जिल्ह्यात १२ मतदान केंद्रभंडारा : निवडणूक आयोगाने नागपूर शिक्षक मतदार संघाचे द्विवार्षिक निवडणूक घोषित केली असून सदर निवडणुकीची आचारसंहिता भंडारा जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. मनीपॉवर रोखण्यावर भर देण्यासोबतच यासंदर्भात येणाऱ्या तक्रारी तात्काळ दखल घेण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज या संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे, अधीक्षक उत्पादन शुल्क सुरेंद्र मनपिया, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले व सर्व तहसीलदार उपस्थित होते.भंडारा जिल्ह्यात एकूण १२ मतदान केंद्र असून यात नाकाडोंगरी - ७५, तुमसर - ५५४, मोहाडी - १८९, भंडारा - १०७१, सावरी जवाहरनगर - ७३, धारगाव - ३८, साकोली - ४७४, लाखनी ४४०, पालांदूर - १०७, अड्याळ - १६०, पवनी - २५७ व लाखांदूर - २६१ असे एकुण ३ हजार ६९९ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १० जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. १७ जानेवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून १८ जानेवारी रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० जानेवारी असून शुक्रवार ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान होईल. मतमोजणी ६ फेब्रुवारी २०१७ रोजी करण्यात येणार आहे.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणुकीसंदर्भात कायदा व सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्त आराखडा १० जानेवारी सादर करण्यात यावा, आचारसंहिता असल्यामुळे पदाधिकारी यांची वाहने काढून न घेता त्या वाहनांचा गैरवापर होणार नाही याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, मतदान केंद्राची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती तात्काळ करावी, मतदान केंद्रावर मूलभूत सुविधांची उपलब्धता असावी, मतदान पथकाची नेमणूक करून तहसीलदारांनी १२ जानेवारी पर्यंत अहवाल सादर करावा, इतर सर्व निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक सुद्धा गांभीर्याने घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था, अवैध दारु, होर्डिंग - बॅनर काढणे व आचार संहितेचे पालन या संबंधिचा अहवाल आदर्श आचारसंहिता कक्षास नियमित पाठवावा. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा, मतदान मशिनचे प्रात्यक्षिक, शालेय परिसंवाद, अर्ज स्वीकारण्यासाठी बॉक्स ठेवणे, युवा मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी युवा महोत्सव आयोजित करणे, सैन्य दलातील मतदार नोंदणी व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. (नगर प्रतिनिधी)