शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षणातून जीवनात आनंदाची बाग फुलवा

By admin | Updated: January 25, 2015 23:09 IST

तांत्रिक शिक्षणामुळे युवकांच्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि त्यातून देशाच्या तांत्रिक विकासाला काय हातभार लागू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिक शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात

साकोली : तांत्रिक शिक्षणामुळे युवकांच्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि त्यातून देशाच्या तांत्रिक विकासाला काय हातभार लागू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिक शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खासगी क्षेत्रात अधिक वाव आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या युवकांची येणाऱ्या काळाची गरज आहे. त्यामुळे तंत्रशिक्षणाची कास धरा, जीवनात आनंदाची बाग फुलवा, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. आरेकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१४-१५ यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील प्राचार्य डॉ. मनीष बिहाडे, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य मनीष लेंढे उपस्थित होते. दरम्यान, मेळावा परिसरात विविध महाविद्यालयाकडून लावण्यात आलेल्या स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यात नागपूर भंडारा, वरठी, देवरी, उमरेड येथील विविध तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाचा इन्स्टिटयूटचा समावेश होता. मेळाव्यातील मार्गदर्शन ऐकण्यासाठी तालुक्यातील एकोडी, बाम्पेवाडा, किन्ही, जांभळी/सडक, वडेगाव, साकोली, सेंदुरवाफा, उमरी, सातलवाडा, पिंडकेपार, सानगडी, कुंभली येथील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकडोच्या संख्येत हजेरी लावली.दुपारच्या सत्रात नागपूर येथील आशिष शर्मा यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिरुध्द अभ्यंकर तर संचालन व आभार प्रा. रजनी गायधनी यांनी केले. कार्यक्रमासाठी एस. सी. तोडासे, एस. सी. ठाकरे, व्ही. पी. बघेले, प्रा. अनिल सार्वे, प्राचार्य पुष्पराज झोडे, राकेश चकोले, प्रा. तृप्ती वासनिक, प्रा. अश्विनी रंगारी, प्रा. रुपाली सोनडवले, प्रा.विशाल परशूरामकर, रवी भोंगाने तसेच वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)