चिचाळ : माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते विरास घावळे व सुनील घावळे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास आघाडी पॅनलने ९ पैकी ६ जागांवर घवघवीत यश मिळवून ग्रामपंचायतीवर पुन्हा झेंडा रोवला आहे. गट ग्रामपंचायत ब्रम्ही येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ग्राम विकास आघाडी पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल लढतीमध्ये काँग्रेसप्रणित आघाडी पॅनलचे विलास घावळे, सुनील घावळे, सोनाली वैरागडे, रंजु काटेखाये, नीलिमा मेश्राम, विजया चावरे, तर परिवर्तन पॅनलचे हरिदास बन्सोड, कोटिराम घावळे, किरण बागळे विजयी झाले. या लढतीमध्ये विलास घावळे यांचे ग्राम विकास आघाडी पॅनलने बहुमत सिद्ध केले आहे. विजयी उमेदवारांची ढोल-ताशांच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वसंत घावळे, संग्राम घावळे, देवचंद वैरागडे, मन्साराम बोरकर, वासुदेव धनजुडे, मंगल चावरे, रामकृष्ण बोरकर, बाला काटेखाये, श्रीराम त्रिपात्रे, माधवराव मेश्राम, यादवराव घावळे, विलास वैरागडे, शांताराम मेश्राम व ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्रम्ही येथे ग्रामविकास आघाडी पॅनलचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST