शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

कोका अभयारण्यातून पाच लाकूड तस्करांना अटक

By admin | Updated: November 29, 2015 01:30 IST

कोका अभयारण्यातील सालेहेटी बिटातून आडजातीचे नऊ नगांची वाहनातून तस्करी करताना कोका अभयारण्यातील भरारी पथकाने सापळा रचून वनतस्करांना पकडले.

भंडारा/करडी : कोका अभयारण्यातील सालेहेटी बिटातून आडजातीचे नऊ नगांची वाहनातून तस्करी करताना कोका अभयारण्यातील भरारी पथकाने सापळा रचून वनतस्करांना पकडले. ही घटना शनिवारच्या पहाटे २ वाजता घडली. भरारी पथकाने वाहनासह पाच जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता या पाचही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आले आहे.कोका अभयारण्यातील सालेहेटी बीट क्रमांक १६४ मधून आडजात भेरा प्रजातीच्या लाकडांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती कोका अभयारण्यातील भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३२ क्यू. ३२९६ हे वाहन रात्रीच्या सुमारास गस्तीदरम्यान अडविण्यात आले. त्यानंतर या वाहनाची तपासणी केली असता त्यात भेरा प्रजातीची मोठमोठी नऊ लाकडे आढळून आली. या लाकडांची किंमत ५,५०० रूपये असल्याचे सांगण्यात आले. या वाहनातील सहा जणांची चौकशी केली असता त्यांनी ही लाकडे चोरीची असून सालेहेटी बीट क्रमांक १६४ मधून नेत असल्याचे सांगितले. त्यावरून भरारी पथकाने वाहनचालक प्रशांत प्रभू मोहतुरे (३५) रा.माटोरा, सुखदेव भिवा मेश्राम (४६) रा.सितेपार, अंकुश दशरथ मोहनकर (३२) रा.माटोरा, हरिश्चंद्र विठ्ठल लुटे (४०) रा.माटोरा, विलास बाळकृष्ण रेहपाडे (२४) रा.माटोरा या पाच जणांना अटक करण्यात आली. तर बाळकृष्ण बाबुराव कामथे (२८) रा.माटोरा हा आरोपी फरार झाला. या आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शेडगे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. मारबते, वन कर्मचारी जे.के. ढाले, सुरेश गोखले, वनरक्षक जी.एन. नागरगोचे, बी.एस. कदम, डी.एस. कौरकर, जे.एस. गणवीर, रामचंद्र उके, प्रकाश कुळमथे, अतुल शिंगाडे यांनी केली. (शहर प्रतिनिधी / वार्ताहर)