शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाच सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:17 IST

तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखललोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे. उर्वरित तीन जणांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत) कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे.तुमसर शहर संवेदनशील असून शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.मागील काही महिन्यात तुमसरात गुन्ह्यात वाढ झाली होती. शहरातील रॉकी वासनिक (२५), छब्ब्या कटकवार (३०), प्रशांत धुर्वेे (३२) यांच्यावर २३ आॅक्टोबर २०१६ मध्ये दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. तसेच डोडल्या हटवार (२८), आदित्य पांडे (२२) यांच्यावर १ जून २०१७ ला दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्हा हद्दपारची कारवाईचा त्यात समावेश आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाल ेयांनी सदर आदेश काढले. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पुराव्यानिशी शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या) अंतर्गत तीन जणांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. यात सतिष डहाट, संतोष दहाट तथा आशिष उर्फ छपरी गजभिये यांचा समावेश आहे. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर गुन्हे तथा आर्म्स अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर कारवाई केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे. तुमसरात मागील काही महिन्यापासून गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हा वाढीचे कारण पोलीस विभागाने वरिष्ठांना सादर केले. त्यानंतर गुन्हेगारावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे. तुमसर शहर भंडारा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. सध्या गुन्ह्यात या शहराने मोठ्या शहरांना मागे टाकल्याची धक्कादायक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती कारवाईचे येथे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गुन्हेगारांवर जबर बसावी, गुन्हेगारीवृत्तीला आळा बसावा हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. शहर अशांत करणाऱ्या असामाजिक तत्वांना डोके वर काढू न देणे हा प्रमुख उद्देश आहे. टोळी व हिंसात्मक कारवाई समाप्त होण्यास मदत होईल. -विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.