शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात मासेमारीला बंदी

By admin | Updated: January 25, 2015 23:08 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातील धरणनजिक मासेमारी करण्यास बंदी घालण्यास आली आहे. यामुळे मांडवी गावातील ३५ ढिवर समाज बांधवाचे कुटूंब अडचणीत आलेली आहेत.

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातील धरणनजिक मासेमारी करण्यास बंदी घालण्यास आली आहे. यामुळे मांडवी गावातील ३५ ढिवर समाज बांधवाचे कुटूंब अडचणीत आलेली आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे.तिरोडा तालुक्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर ४५० कोटी खर्चून धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाची पाणी संचय पातळी २६०.०० मिटर आहे. यंदा ६.५० मिटर धरणात पाणी साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे नदी पात्रात १८ कि़मी. पर्यंत पाणी विस्तारलेले आहे. नदी काठावरील गावे आणि शेत शिवारात पाणी शिरत असल्याने धरणाचे गेट उघडण्यात येत आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह दाब उर्ध्व भागात वाढत आहे. या धरण बांधकामाच्या पुढे मांडवी गावाचे वास्तव्य आहे. यामुळे धरण लगत या गावातील ढिवर समाजातील बांधव मासेमारी करीत आहेत. मासेमारी त्यांचे उपजिविकेचे साधन आहे. या व्यवसायावर ३५ कुटूंबियांचा उदरनिर्वाह आहे. परंतु बॅरेजनजीक गेल्या काही वर्षात अपघात झालेली असून यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे धरण नजीक प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. या परिसरात प्रवेश बंदी असणारे सुचना फलक लावण्यात आलेली आहे. दरम्यान धरण पासून ५०० मीटरपर्यंत नदी पात्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याने ढिवर समाज बांधवावर रोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. या समाजातील नागरिकांकडे शेती नाही. मासेमारी करणे हा एकमेव रोजगार आहे. या व्यवसायावर बंदी घालण्यात आल्याने उपासमारीचे संकट ओढावले आहे.या परिसरात मासेमारी करीत असताना पोलीस तथा प्रशासनाची दडपशाही वाढली आहे. बॅरेजच्या उर्ध्व भागात प्रवेश बंदी असली तरी मासेमारी करण्यास मंजुरी देण्याची ओरड गावात आहे. दरम्यान ५०० मीटर अंतरच्या पुढे नदी पात्रात मासेमारी करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या पात्रात पाणीच राहत नसल्याने मासेमारी अडचणींची ठरत आहे. या पात्रात मासोड्या सापडत नाहीत, असे गाऱ्हाणे ढिवर समाज बांधव मांडव आहेत. मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येणारे पत्र मांडवी ग्रामपंचायत आणि सिहोरा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहे. गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्रमांक ५ तिरोडा या यंत्रणेने हा पत्रव्यवहार केला आहे.बंदी उठविण्यासाठी भंडाराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात सरपंच सहादेव ढबाले, रमेश नागपुरे, मनोज शेंडे, विनोद शेंडे, राधेश्याम नागपुरे, हरिचंद नागपुरे, राजु शेंडे, ईश्वर शेंडे, सुभाष मेश्राम, मानिक शेंडे, शालिक शेंडे, डिगांबर मेश्राम, भारत शेंडे, आशिक शेंडे, चुन्नीलाल नागपुरे, ताराचंद नागपुरे, रूपचंद मेश्राम यांचा समावेश होता.