शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पालोरा शाळेचा पहिला दिवस उत्साहात

By admin | Updated: June 28, 2014 01:01 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालोरा येथे पहिला दिवस उत्साहात साजरा केला गेला. वर्ग १ ते ४ मधील मुलांच्या पालकांना

करडी (पालोरा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालोरा येथे पहिला दिवस उत्साहात साजरा केला गेला. वर्ग १ ते ४ मधील मुलांच्या पालकांना शाळेत येण्यासाठी घरी जावून निमंत्रण दिले गेले. शाळेत पोहचलेल्या मुलांचे पुष्पगुच्द व चॉकलेट देवून मान्यवरांचे हस्ते स्वागत केले गेले. पहिल्या वर्गातील नवगंताचे मनोबल वाढावे, शाळेत रोज येण्यासाठी आवड निर्माण यासाठी वातावरण निर्मिती केली गेली.पालोरा येथील प्राथमिक शाळेत पहिल्या दिवसीच्या उत्साहाप्रसंगीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उज्वला मोटघरे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे उपाध्यक्ष भोजराम तिजारे, युवराज गोमासे, शाळा समिती सदस्या मनिषा बुरडे, माया खराबे, कविता मोटघरे, मुख्याध्यापक चाचेरे, सहायक शिक्षक चंद्रकांत केसाळे, रमेश पवनकर, लता तिडके, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले गेले. यावेळी मुख्याध्यापक चाचेरे, युवराज गोमासे, उज्वला मोटघरे यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांच्या कार्याची आठवण मुलांना करून देण्यात आली. शासनाच्या वतीने पुस्तक दिन म्हणून २६ जून हा दिवस हा साजरा केला जाते. विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तकांचे महत्व किती थोर आहेत. पुस्तकांना गुरू का म्हटले जाते यावरही मार्गदर्शन केले गेले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप केले गेले. गणवेशाचे वाटपही पूर्ण केले गेले.प्रस्तावना व संचालन मुख्याध्यापक चाचेरे यांनी केले तर आभार शिक्षक रमेश पवनकर यांनी केले. विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. जि.प. हायस्कूल पालोरा येथेही नवागतांचे स्वागत केले गेले. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे हस्ते पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप केले गेले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक, मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शाळा समिती सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)