शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आधी रस्ते तयार करा अन्यथा रेती वाहतूक बंद करा

By admin | Updated: November 4, 2016 00:55 IST

तुमसर तालुक्यातील रेती घटांचा लिलाव महसूल प्रशसनाने केला. तत्पूर्वी इतर रेती घाटाचा लिलाव कारण्यात आला.

पंचबुध्दे यांचा इशारा : रस्ते ठरत आहेत मृत्यूचे सापळेतुमसर : तुमसर तालुक्यातील रेती घटांचा लिलाव महसूल प्रशसनाने केला. तत्पूर्वी इतर रेती घाटाचा लिलाव कारण्यात आला. आलटून-पालटून दरवर्षी रेतीघाट लिलाव नित्यनियमाने करण्यात येत आहे. रेती घाटावर जाणारे रस्ते तथा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गावाला जातांनी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. आधी रस्ते दुरुस्त करा नंतरच रेतीची वाहतूक करा असा इशारा जि.प. सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी दिला आहे.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. येथे रेती घाटांची संख्या जास्त आहे. या खेपेला महसूल प्रशासनाने बाम्हणी व चारगाव (दे) येथील रेती घाट लिलाव केला आहे. बाम्हणी तथा चारगाव गावांना जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. एक ते दीड फूट खोल व एक ते दोन मिटर लांब असे जीवघेणे खड्डे पडले आहेत. २५ ते ४० टन रेती ट्रीप वाहतूक या मार्गावर मागील दोन वर्षापासून सुरु आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. हे विशेष.बाम्हणी तथा चारगाव (दे) रेती घाटातून रेतीचे ट्रक खापा-भंडारा या मार्गाने न जाता सुकळी (दे) रोहा-भंडारा या मार्गाने जातात. या मार्गावर १२ ते १५ गावे आहेत. रस्ता अरुंद आहे. रस्त्याची क्षमता नाही. ओव्हरलोड ट्रक या मार्गाने सर्रास मार्गक्रमण करतात दाभा येथे पोलिस चौकी आहे, पंरतु कारवाई शून्यच राहते.मोहाडी तालुक्यातील निलज तथा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रेतीची वाहतूक याच मार्गाने केली जात आहे. रेती घाट लिलाव करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यानी घाटावर जाणारे रस्ते त्यांची स्थिती काय आहे? याची पाहणी करणे अंत्यत गरजेचे झाले आहे. तुमसर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी स्थानिक तहसिलदारांनी रेतीघाट लिलाव प्रक्रीयेत घाट लिलावात समावेश पूर्वी आक्षेप घेण्याची गरज आहे. रस्ते येथे जीव घेणारे ठरले आहेत. गावातून जाणारा रस्ता मृत्यूमार्ग ठरले आहेत.राज्य शासनाला कोट्यावधींचा महसूल देणाऱ्या रेतीघाट गावांना जाणारे रस्ते आधी तयार न केल्यास रेतीची वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य के. के पंचबुध्दे यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे स्थानिक ग्रामस्थासह तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)