शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वाहन न दाखवताच मिळवा ‘पीयूसी’

By admin | Updated: January 24, 2015 00:16 IST

राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरातून दररोज हजारो वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणविरहित असल्याचे प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत ...

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरातून दररोज हजारो वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणविरहित असल्याचे प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या पीयूसी (पोलूशन अंडर कंट्रोल सार्टीफिकेट) केंद्रांकडून देण्यात येते. मात्र, पीयूसी देतानाचे निकष धाब्यावर बसवून वाहनाचे क्रमांक सांगा आणि पीयूसी घेऊन जा असा प्रकार सर्रास सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्या वाहनाचा क्रमांक सांगून पीयूसी मिळविल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आले आहे. या पाहणीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताही अंकुश नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. ‘लोकमत चमू’ने शहरातील विविध कार्यालयात भंगारात पडून असलेल्या वाहनांची पीयूसी या केंद्रांकडून केवळ वाहनाचे क्रमांक सांगून सहजरित्या मिळविले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भंडारा शहरात चार प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र अधिकृतरीत्या सुरू आहेत. ग्रामिण भागात असे केंद्र नसून फिरते केंद्रही नाहीत. यापैकी सर्वच पीयूसी केंद्रांवर वाहनांची धूर तपासणी न करताच पीयूसी देण्यात येत आहे. परिणामी भंडारा शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. वाहनांची स्थिती आणि ते प्रदूषणविरहित आहे का? याची शहानिशा न करताच पीयूसी दिली जात असल्यामुळे भंडारावासीयांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १० वर्षांपासून बंदस्थितीत धूळ खात पडलेल्या या वाहनाचा क्रमांक सांगून ‘लोकमत चमू’ ने पीयूसी प्रमाणपत्र मिळविले. (लोकमत चमू)स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयवेळ : १.११ वाजताजिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे या कार्यालयात आल्यानंतर त्यांच्या एम.एच.३६/ के.२२२२ या कारचे छायाचित्र ‘लोकमत चमू’ने टिपले. आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या पीयूसी केंद्रावर सदर प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची पीयूसी काढण्यासाठी गेले. तेथील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असे विचारले असता बाजारात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वाहन क्रमांक आणि प्रकार विचारला असता दुचाकी वाहन असल्याचे सांगीतले.तेथील कर्मचाऱ्याने ३५ रुपये आकारुन प्रमाणपत्र दिले.स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयवेळ : १.१० वाजताजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बंद स्थितीतील धूळ खात कार एम.एच. ३५ -डी. १००० या वाहनाचे छायाचित्र. त्याच पीयूसी केंद्रावर त्या बंद वाहनाची पीयूसी काढण्यासाठी सदर प्रतिनिधी गेले. तेथील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असे विचारुन वाहनाचे नाव आणि क्रमांक विचारले. वाहन चौकात आहे, असे सांगितल्यानंतर ११० रूपये लागतील असे सांगण्यात आले. त्यानंतर ११० रुपये आकारुन पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आले.स्थळ : पोलीस मुख्यालयवेळ : १.३० वाजताभंगार स्थितीतील वाहनांमध्ये रॉकेल सर्रासपणे टाकून वाहन चालविण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. अशा वाहनांवरही पीयूसी प्रमाणपत्र दिसून येते. लोकमत प्रतिनिधीने पोलीस मुख्यालयात धूळ खात पडलेल्या भंगार वाहनाचा क्रमांक सांगितल्यानंतर तेथील पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्याने कोणतीही विचारपूस व वाहनही न बघता पैसे घऊ’बिनबोभाट पीयूसी प्रमाणपत्र प्रतिनिधीला दिले.