शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

अखेर 16 कोरोना योद्धा सफाई कामगार आरोग्य सेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:15 IST

कोरोना योद्धा सफाई कामगार व सहाय्यक यांना सेवेत पुर्ववत रुजु करुन घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ मार्चपासुन बेमुदत ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला १६ दिवस पुर्ण झाल्यानंतरही या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाने पाठ दाखविली. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांना अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले.

ठळक मुद्देरिपब्लिकन पँथरच्या लढ्याला यश : ढोल बजाओ आंदोलन मागे

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना योद्धा सफाई कामगार व सहायक यांना सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.रिपब्लिकन पँथर संघटनेनुसार कोरोना योद्धा सफाई कामगार व सहायक यांना सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पँथर संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ मार्च पासून बेमुदत ढोल बजाओ आंदोलन सुरू होते.  या आंदोलनात एकूण १६ कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील २५ पेक्षा जास्त संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पँथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे, जिल्हा महासचिव आदेश कानतोडे, तालुकाध्यक्ष अखिलेश वैद्य, संयुक्त लोकशाही आघाडीचे जेष्ठ नेते अचल मेश्राम, सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष तुलशीराम गेडाम, बुद्धिष्ट युथ फॉर्सचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव हिवराज उके, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवदास गजभिये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी, मैत्री महिला संघटनेच्या हेमाताई गजभिये, एकलव्य सेनेचे दिपक मारबदे, इंटक कास्ट्राईब संघटनेचे डॉ. विनोद भोयर, संयुक्त लोकशाही आघाडीचे नाशिक चवरे, संजीव भांबेरे, राहुल वानखेडे, शशिकांत देशपांडे, दिगंबर रामटेके, शिवसेना महिला आघाडीच्या सविता तुरकर, शालिनी नागदेवे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी झाले होते. सदर आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आंदोलनात सहभागी सर्व १६ कोरोना योद्ध्याना सेवेत पूर्ववत रुजू करून घेतल्यानंतर २३ मार्चला सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

ढोल वाजवून वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कोरोना योद्धा सफाई कामगार व सहाय्यक यांना सेवेत पुर्ववत रुजु करुन घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ मार्चपासुन बेमुदत ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला १६ दिवस पुर्ण झाल्यानंतरही या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाने पाठ दाखविली. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांना अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची माफी मागुन लक्ष वेधण्यासाठी ढोल वाजविल्याचे सांगितले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी घडवुन आणत जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवुन आंदोलनकर्त्यांना सेवेत रुजु करण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या