शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

मूठभर तांदूळ अन वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी!

By admin | Updated: April 3, 2015 00:18 IST

बालपणी जिच्यासोबत पहिली ओळख होते ती चिऊताई ! ही चिऊ दिवसभर गवताच्या काड्या, कापूस, धागे, पिसे जमा करून

भंडाराकरांना चिऊताईची ओली हाकबालपणी जिच्यासोबत पहिली ओळख होते ती चिऊताई ! ही चिऊ दिवसभर गवताच्या काड्या, कापूस, धागे, पिसे जमा करून घरात घरटे बांधायची. आज मात्र ती विव्हळते आहे. काय आहे तिचे म्हणणे? चिऊताई म्हणते, ‘‘चिल्ल्या-पिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता ? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहत आहे. घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काहीजण म्हणत आहेत. माझी ओली आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’चिमण्यांची चिमणी पाखरं लहान कीटकांवर वाढतात. हे कीटकही जंतुनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीत जास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते. चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहत नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. शहरात पाणी अनेक ठिकाणी उपलब्ध असते मात्र, ते स्वच्छ नसते. अनेकांनी आपल्या घराबाहेर पाखरांना पाणी पिता यावे म्हणून सोय केलेली आहे. मात्र, ते रोज बदलवले जात नाही. ते बदलवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त पाणी लागते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात व फ्लॅटच्या बालकनीमध्ये धान्य व स्वच्छ पाणी रोज उपलब्ध करून द्यावे.