शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:31 IST

लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ फेरविचार याचिका दाखल करावी.

ठळक मुद्देअ‍ॅट्रॉसिटी कायदा : आंबेडकरी कार्यकर्त्यांची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ फेरविचार याचिका दाखल करावी. त्यात विशेष तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती करावी दरम्यान संसदेने सामाजिक न्यायासाठी विधेयक आणून या कायद्यात संशोधन करावे, अशी मागणी शहरातील आंबेडकरी विचारवंतांनी प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.२० मार्च २०१८ रोजी डॉ. सुभाष काशिनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील अत्याचार प्रतिबंध कायद्याखालील प्रकरणामध्ये फिर्यादीच्या तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये आणि आरोपीला अटक करणे बंधनकारक नाही. तसेच सरकारी कर्मचाऱ्याला त्यांच्या अधिकाºयाच्या परवानगीशिवाय अटक करू नये, पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या अहवालानंतर गुन्हा नोंदवावा असा निर्णय दिला आहे. त्यामुळे या समाजात असुरक्षिततेची भावना व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्यादीने जी तक्रार केली आहे तिचा खरेपणाविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाने तपास करावा. त्यानुसार त्यांच्या अहवालानुसारच आरोपीवर गुन्हा नोंदवावा, लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास त्यांच्या नियुक्ती करणाºया अधिकाºयांच्या संमतीशिवाय अटक करू नये, गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीला अटकपूर्व जामीन न देण्याचे कलम १८ लागू होणार नाही अर्थात बंधन राहणार नाही, फिर्यादीनुसार प्रथमदर्शनी गुन्हा नसेल तर अटकपूर्व जामीन देता येईल या मुद्यांचा अंतर्भाव आहे. या कायद्याला बोथट केल्यामुळे आता या कायद्याची जातीयवाद्यांना भिती राहणार नाही. हा कायदा असूनही दररोज अत्याचार होत आहे. कायदाच खिळखिळा व निष्क्रीय केला तर अन्याय अत्याचारात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. शिष्टमंडळात अमृत बन्सोड, गुलशन गजभिये, महेंद्र गडकरी, प्रशांत सूर्यवंशी, आदिनाथ नागदेवे, डी.एफ. कोचे, महादेव मेश्राम, एम.डब्लू. दहिवले, आसित बागडे, संजय बन्सोड, सचिन बागडे आदींचा समावेश होता.