शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने पोलिसाला चिरडले

By admin | Updated: March 27, 2016 00:17 IST

न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कर्तव्यावर जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने पोलीस हवालदारास चिरडले. ...

वीज कार्यालयासमोरील घटना : न्यायालयीन कर्तव्यावर जाताना अपघातभंडारा : न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कर्तव्यावर जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने पोलीस हवालदारास चिरडले. जखमी अवस्थेत नागपूरला नेत असताना त्यांचा दुदैवी अंत झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वीज वितरण कार्यालयासमोर घडली.शेषराव दिवान तितिरमारे (४८) रा. विद्यानगर, भंडारा असे मृतक पोलीस हवालदाराचे नाव आहे. मृतक शेषराव हे जवाहरनगर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. नित्याप्रमाणे सकाळी ते ठाण्यात हजर झाले. त्यांना शनिवारला भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कर्तव्य बजवायचे होते, असे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले. त्यामुळे ते न्यायालयीन कर्तव्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच ३६ जे ४२६६ ने जवाहरनगर ठाण्यातून भंडारा येथील न्यायालयाकडे निघाले. दरम्यान नागपूरकडून भंडाराकडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक डब्ल्यू बी ११ सी ६३७५ ने दुचाकीवरील त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह महामार्गावर कोसळल्याने ते ट्रकखाली आले. यात त्यांच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीररित्या जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चालकाने ट्रक घटनास्थळीच ठेवून पळ काढला. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देत जखमी शेषराव यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मात्र, पारडीजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व चार मुली असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ८ वाजता वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी ट्रकचालकाविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)