शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने इसमाला चिरडले

By admin | Updated: December 23, 2015 00:31 IST

नवेगाव येथून मोहदुराकडे जाणाऱ्या एका सायकलस्वाराला शहापूरहून सातोनाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले.

मृतदेह झाला छिन्नविछिन्न : सातोना-शहापूर मार्गावरील घटनामोहदुरा : नवेगाव येथून मोहदुराकडे जाणाऱ्या एका सायकलस्वाराला शहापूरहून सातोनाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात दामा फुकटू कुंभरे (६०) रा. नवेगाव या इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान सातोना मार्गावरील मोहदुरा वळणावर घडली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप केला जात आहे. दामा कुंभरे हे बेलदारीचे काम करतात. आज मंगळवारला कामाला सुटी असल्यामुळे ते काही कामानिमित्त ते मोहदुरा येथे सायकलने निघाले. दरम्यान शहापूरहून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने नवेगाव-मोहदुरा मार्गावरील वळणावर त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कुंभरे यांचा घटनास्थळीच ठार होऊन मृतदेह छिन्नविछिन्न झाला. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. अपघाताची वार्ता पसरताच घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. घटनेचा तपास भंडारा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)प्रशासनाचे लक्ष केव्हा जाणार ?सातोना - शहापूरमार्गे दररोज शेकडो ट्रकांचे आवागमन भरधाव वेगात सुरु असते. यामध्ये सर्वाधिक प्रमाण रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे आवागमन असते. दिवसरात्र सुरु असलेल्या या जड वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी रेतीच्या भरधान ट्रॅक्टरने एका बालिकेचा चिरडले होते. आज पुन्हा ट्रकच्या धडकेत एका इसमाचा नाहक बळी गेला. या मार्गावर अनेकदा लहानमोठे अपघात सुद्धा घडलेले आहेत. या रस्त्यावर असलेल्या वृक्षामुळे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना सामोरचे काहीच दिसत नाही. अपघात ज्या रस्त्याच्या मोडीवर घडला तिथे झाडे कापण्याची गरज आहे. असे असतानाही याकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही?